आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सऑफिस / दोन दिवसांतच चित्रपटाने वसूल केला निर्मिती खर्च, 'बधाई हो'ने कमावले 19 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः दस-याच्या मुहूर्तावर रिलीज झालेला आयुष्मान खुराणा आणि सान्या मल्होत्राचा बधाई हो हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. 20 कोटींच्या निर्मिती खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.29 कोटींचा बिझनेस केला. दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली बघायला मिळाली. शुक्रवारी या चित्रपटाने  11.67 कोटी रुपये कमावले. दोन दिवसांतच या चित्रपटाने जवळजवळ निर्मिती खर्च वसूल केला. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शन यांनी ट्वीट करुन चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.

 

#BadhaaiHo is on a winning streak... Is SUPERB on Day 2... Eclipses biz of *all films* in the marketplace [new + holdover titles]... Thu 7.29 cr, Fri 11.67 cr. Total: ₹ 18.96 cr. India biz… Expect BIGGER NUMBERS on Sat and Sun.

— taran adarsh (@taran_adarsh) October 20, 2018

 

चित्रपट समीक्षकांनी दिली चांगली रेटिंग :
देशभरात सुमारे 2000 स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला चित्रपट समीक्षकांनी चांगली रेटिंग दिली आहे. समीक्षकांकडून मिळालेली कौतुकाची पावती प्रेक्षकांना थिएटरकडे आणत आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांतही कमाईचे आकडे वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयुष्मान आणि सान्या मल्होत्रासोबत चित्रपटातील इतर कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

 

मुलं तरुण झाल्यावर प्रेग्नेंट होते आई: 
चित्रपटात नवी दिल्लीच्या सादिक नगरातील रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणा-या कौशिक कुटूंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. प्रियंबदा आणि जितेंद्र कौशिक यांची नकुल आणि गुल्लर ही दोन मुलं. नकुल नुकताच मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला लागलेला तर गुल्लर बारावीत शिकणारा. सामान्य मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटूंब. अचानक एकेदिवशी प्रियंबदाची तब्येत बिघडते. डॉक्टरकडे गेल्यावर कळते की, ती गर्भवती आहे. दोघेही हादरतात. मुलांना आणि घरात असलेल्या म्हाताऱ्या आईला ही बाब कशी सांगायची हा पेच पडतो. पण, सांगतात. मुलं एकदम बिथतात. नकुलची प्रेयसी रिनी त्याला समजावून सांगते. एकएक पैलूवर विचार करताना नकुलला स्वत:ची चूक लक्षात येते. अन् मग, तो आई आणि होणाऱ्या बाळाला स्विकारतो. पण, तोवरचा कुटूंबाचा प्रवास खरोखरंच हृदयस्पर्शी आहे.


चित्रपटात नीना गुप्ता यांनी आयुष्मानच्या आईची भूमिका साकारली आहे, तर गजराज राव वडिलांच्या भूमिकेत आहेत. अमित शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...