आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलापूर टीडीअार घाेटाळ्यातील संशयित मुख्याधिकाऱ्यास अटक; कोट्यवधींच्या मालमत्तेचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिकेत टीडीआर विक्रीप्रकरणांत तब्बल २० कोटींचा घोटाळा केल्या प्रकरणात तीन वर्षापासून फरार असलेल्या संशयित मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यास ठाणे शहर पोलिसांच्या अार्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मंगळवारी (दि. २५) सकाळी तीन हात नाक्यावर ठाण्याहून नाशिकला येण्यासाठी बस शोधत असताना पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. 


ठाणे पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, संशयित मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी हे बदलापूर नगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना उद्यान आणि रस्ते रूंदीकरणासाठी टीडीआर खरेदी-विक्रीचे माेठ्या प्रमाणात व्यवहार झाले हाेते. या व्यवहारात २० कोटींचा अपहार केल्याचे सहायक संचालक नगररचना आणि विशेष लेखा समितीला अाढळले होते. याप्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात गोसावी यांच्यासह नगराध्यक्षांसह विद्यमान नगरसेवक, मुख्य अभियंता, चार सहायक अभियंता, सहनगररचनाकार आणि ठेकेदार अशा २१ संशयितांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास अार्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. सहायक आयुक्त शांताराम अवसरे यांचे पथक संशयित गाेसावीच्या मागावर हाेते. गोसावी हा नाशिकला जाण्यासाठी निघाला असल्याची माहिती मिळताच अवसरे यांच्या पथकाने तीन हात नाक्यावर सापळा रचला. 


नाशिककडे जाणाऱ्या बसला हात देत असतानाच त्यास अटक करण्यात अाली. ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (दि. २७) पोलिस कोठडी मिळाली. याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष वामन म्हात्रे, राजन घोरपडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 


टीडीअारच्या एकूण ५५ प्रकरणात अपहार 
संशयित गाेसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार हाेते. त्यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. मात्र, दिलासा न मिळूनही ते पाेलिसांना शरण अाले नाही. अखेरीस त्यांच्या मागावर पथक असतानाच त्यांना अटक झाली. गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा हाती लागला असून लेखापरीक्षण व तपासानुसार टीडीअारच्या ५५ प्रकरणात २० कोटींचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 
- शांताराम अवसरे, सहायक पाेलिस आयुक्त, ठाणे 


गाेसावी यांची नाशिकराेडला मालमत्ता 
गाेसावी हे मूळचे नाशिकराेड दत्तमंदिर भागातील रहिवासी अाहेत. दत्त मंदिर भागात त्यांचे इतर भाऊ याच भागात वास्तव्यास अाहेत. निलंबित मुख्याधिकारी भालचंद्र गाेसावी यांनी या भागात काेट्यवधींची मालमत्ता जमविल्याचाही पाेलिसांना संशय अाहे. या कारवाईने नाशिकमधील त्यांचे मित्र, नातलग व राजकीय मंडळीत खळबळ उडाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...