मलेशिया / विमानतळानजीक अपघातात नंबर वन बॅडमिंटनपटू केंताे माेमाेताला गंभीर दुखापत; चालक जागीच ठार

रविवारी जिंकला मलेशिया मास्टर्सचा किताब
 

वृत्तसंस्था

Jan 14,2020 09:13:00 AM IST

क्वालांलपूर - किताब जिंकून मायदेशी परतणारा जगातील नंबर वन बॅडमिंटनपटू केंताे माेमाेता एका भीषण अपघातात थाेडक्यात वाचला.मात्र, त्याला घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या चालकाचा जागीच मृत्यु झाला. विमानतळानजीकच्या परिसरात हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये माेमाेताच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.त्यामुळे त्याला आणि चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासून वैद्यकीय पथकाने चालकाला मृत्यु घाेषित केले. तसेच माेमाेतावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे.


मलेशिया बॅडमिंटन असोसिएशनचे महासचिव केनी गाेह यांनी या वृत्ताला दुजाेरा दिला. मात्र त्यांनी आता माेमाेताची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. हा अपघात अधिकच भीषण असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

X
COMMENT