Home | Sports | Other Sports | badminton-skirt-regulation

महिला बॅडमिंटनपटुंवरील स्कर्टच्या सक्तीचा निर्णय मागे

agencies | Update - May 30, 2011, 09:52 AM IST

महिला बॅडमिंटनपटूंना खेळतांना स्कर्ट घालण्याची सक्ती करण्याचा निर्णय जागितिक बॅडमिंटन महासंघाने अनिश्चित कालावाधीसाठी मागे घेतला आहे.

  • badminton-skirt-regulation

    skirt_258महिला बॅडमिंटनपटूंना खेळतांना स्कर्ट घालण्याची सक्ती करण्याचा निर्णय जागितिक बॅडमिंटन महासंघाने अनिश्चित कालावाधीसाठी मागे घेतला आहे. महासंघाच्या वेबसाईटवर हा निर्णय अधिकृतरित्या जाहिर करण्यात आला आहे. स्कर्टच्या सक्तीचा नियम 1 जूनपासून लागू होणार होता.

    महिला बॅडमिंटन समितीच्या सुचना महासंघाने मान्य केल्या असल्याचे वेबसाईटवर दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. महासंघाच्या निर्णयाला सर्वच महिला बॅडमिंटनपटुंकडून विरोध झाला होता. महासंघावर अश्लिलतेचा आरोप करण्यात आला होता.
Trending