आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Badminton Star Jwala Gutta Get Angry As Her Name Is Not Appeared In Voter List

बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टाचे नाव मतदार यादीतून गायब, ट्वीटरवर व्यक्त केला संताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणा विधानसभेसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच तेलंगणामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटी मतदानासाठी पोहोचत आहेत. मात्र देशाचे प्रतिनिधीत्व केलेली स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा मात्र मतदानापासून मुकली आहे. मतदार यादीत तिचे नावच नसल्याने तिला मतदान करता आले नाही, आणि याचा राग तिने ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केला. 


ज्वालाने काय ट्वीट केले..
ज्वालाने मतदार यादीत नाव नसल्याचा संताप व्यक्त करणारे दोन ट्वीट्स केले. आधी पहिल्या ट्वीटमध्ये तिने तिचे नावच वोटर लिस्टमध्ये नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तिने आणखी एक ट्वीट केले त्यात तिने म्हटले, जर माझे नावच मतदार यादीत नसेल तर ही निवडणूक योग्य कशी असू शकते. 

 

Surprised to see my name disappear from the voting list after checking online!! #whereismyvote

— Gutta Jwala (@Guttajwala) December 7, 2018
How’s the election fair...when names r mysteriously disappearing from the list!! 😡🤬
— Gutta Jwala (@Guttajwala) December 7, 2018
राजस्थान आणि तेलंगणामध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तेलंगणामध्ये सकाळी 7 वाजेपासून मतदान झाले. चिरंजीवी, नागार्जुन, अल्लू अर्जुन अशा अनेक स्टार्सने मतदान केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...