आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Badminton: Takahashi Defeats Saina Nehwal For The Second Time; Sameer In The Second Round

बॅडमिंटन : ताकाहाशीने दुसऱ्यांदा सायना नेहवालला हरवले; समीर दुसऱ्या फेरीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडेंसे - आठव्या मानांकित सायना नेहवाल डेन्मार्क ओपनमध्ये चांगली सुरुवात झाली नाही. ती पहिल्याच फेरीतून पराभवासह बाहेर झाली. दुसरीकडे, समीर वर्मा विजयासह दुसऱ्या फेरीत पोहोचला. मिश्र दुहेरीत अश्विन पोनप्पा व सात्त्विक साईराज जोडी दुखापतीमुळे उतरली नाही.

समीरने पुरुष एकेरीमध्ये जपानच्या कांता सुनेयामाविरुद्ध चांगली सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये तो ४-० ने पुढे होता. त्यानंतर त्याने आघाडी ११-५ ने वाढवली. त्यानंतर २१-११ ने गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये समीरने अधिक त्रास झाला नाही. त्याने २१-११ ने गेमसह सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हा सामना २९ मिनिटात संपला. आता पाचव्या मानांकित चीनच्या चेन लोंगशी ताे भिडेल. पी.व्ही. सिंधू आणि बी.साईप्रणीत दुसऱ्या फेरीत पोहोचले. पुरुष एकेरीत प्रकाश पादुकोन व किदांबी श्रीकांत चॅम्पियन बनले आहे. दुसरीकडे, महिला एकेरीत २०१२ सायनाने एकमेव किताब जिंकला.
 

ताकाहाशीने सायनाला २ गेममध्ये हरवले; ३७ मिनिटांत विजय 
महिला एकेरीमध्ये बिगरमानांकित जपानच्या सयाका ताकाहाशीने सायनाला २१-१५, २३-२१ ने हरवले. सयाकाने पहिल्या गेममध्ये ११-०८ ने आघाडी घेतली, त्यानंतर २१-१५ ने विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्ये सायनाने थोडा संघर्ष केला, मात्र सयाकाने हा गेम २३-२१ ने जिंकून सामना आपल्या खिशात घातला. हा सामना ३७ मिनिटात संपला. सयाकाने सलग दुसऱ्यांदा सायनाला हरवले. दोन्ही खेळाडूंतील हा सहावा सामना होता. सध्या सायना ४-२ ने पुढे आहे. दुसरीकडे, मिश्र दुहेरीत प्रणव चोपडा व सिक्की रेड्डी जोडीने २९ मिनिटात जर्मनीच्या मार्विन सॅडिल-लिंडा एफलरला २१-१६, २१-११ ने मात देत दुसरी फेरी गाठली.