आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्हायरल फोटोत आहे एक कोडे, तरुणीची पाठ दिसतेय की मान? लोकांनी लावल्या पैजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही कहाणी 'सोशल व्हायरल सिरीज'अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा स्टोरीज व्हायरल झाल्या आहेत, ज्यांची आपल्याला माहिती असली पाहिजे.)

 

खबरे जरा हटके डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप जास्त व्हायरल होत आहे३ हा फोटो पाहून लोक कन्फ्यूज होत आहेत. या फोटोत एका मुलीचे  डोक्यावरील कुरळे केस आणि तिच्या शरीराचा काही भागच दिसतोय. हा भाग ऑप्टिकल इल्यूजन (दृष्टि भ्रम) तयार करतोय. हा पाहिल्यानंतर हे कळत नाहीये की, हा फोटो मानेचा आहे की पाठीचा?

 

फोटो पाहून लोकांनी लावल्या पैजा
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल होत असलेला हा फोटो लिल मार्टी नावाच्या एका युजरच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, 'मला वाटले ही तिची मान आहे, पण असे झालेच कसे?'

- मार्टीने शेयर केलेला हा फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल झाला. काही दिवसांतच याला 32 हजारहून जास्त लोकांनी रिट्विट केला, दुसरीकडे 70 हजारहून जास्त जणांनी याला लाइक केलेले आहे. तथापि, लोकांना अजूनही संभ्रम आहे की, मुलीच्या शरीराच्या कोणत्या भागाचा हा फोटो आहे?
- काही जण याला मानेचा फोटो सांगतात, तर काही जणांना ही जमिनीवर बसलेली एक मुलगी वाटतेय, जिचे केस आणि पाठ दिसतेय. तथापि, बहुतांश जणांचे मानणे आहे की, हा फोटो जमिनीवर बसलेल्या तरुणीचा आहे. जिला तिच्या पाठीमागून घेण्यात आले आहे, या फोटोत तिच्या डोक्यावरचे केस आणि पाठ दिसतेय. 

 

Why tf I thought this was her neck pic.twitter.com/4gMnOlTegc

— MartyMula (@LilMaarty) October 7, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...