Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | bags with Thirty lakhs were stolen by thieves

मारहाणीनंतर डोळ्यात मिरची पूड टाकली, ३ लाखांची बॅग पळवली

दिव्य मराठी | Update - Sep 01, 2018, 11:08 AM IST

राॅडने मारहाण करून व डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख दहा हजार रुपयांची बॅग चोरांनी पळवली. ही घटना श्ुक्रवारी रात्री साडे

  • bags with Thirty lakhs were stolen by thieves

    सोलापूर- राॅडने मारहाण करून व डोळ्यात मिरची पूड टाकून तीन लाख दहा हजार रुपयांची बॅग चोरांनी पळवली. ही घटना श्ुक्रवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान अक्कलकोट रस्ता, गांधीनगर ते जवाहर नगर मार्गावरील माया अपार्टमेंट जवळ घडली. इरफान अ. अब्दुल शेख (रा. जवाहर नगर, सोलापूर) यांच्याजवळील बॅग चोरांनी पळविली. रात्री उशिरापर्यंत शेख यांच्याकडून फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. शेख हे शफी ट्रेडिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. दिवसभरात जमा झालेली रोकड अयोध्यानगर येथे राहणाऱ्या मालकाकडे जमा करण्यासाठी ते निघाले होते. त्यांच्या सोबत आणखी एक तरुण होता. दोघेजण दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जात होते.


    त्यावेळी दोन तरुण दुचाकीवरून आले. दुचाकी अाडवी लावून राॅडने मारहाण करून मिरची पूड डोळ्यात टाकून पैशांची बॅग पळविली. हे चोरटे २० ते २२ वर्षे वयाचे असावेत. या घटनेचा तपास सुरू असून तक्रार दाखल झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.

Trending