आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदार सावित्रीबाई फुलेंनी पक्षाला ठोकला रामराम, म्हणाल्या-भाजपचा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहराईच - येथील भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजप समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याने राजीनामा देत असल्याचे सावित्रीबाई यांनी म्हटले आहे. खासदार सावित्रीबाई फुले यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारविरोधात वक्तव्ये केली आहेत. तसेच त्यांनी दलितांच्या मुद्द्यावरून अनेकदा योगी सरकारवरही हल्ला केला आहे. 
 
वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास
सावित्रीबाई फुले यांनी अनेकदा विविध विषयांवर वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना त्यांनी भाजप आरक्षण आणि संविधान नष्ट करण्यासाठी कारस्थान रचत असल्याचे म्हटले होते. 
 
अयोध्येबाबतही केले होते वक्तव्य 
अयोध्येतील राम मंदिराबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. सलेमपूर येथे आयोजित भीमचर्चा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अयोध्येमध्ये राममंदिर नव्हे तर बुद्ध मंदिर तयार व्हायला हवे असे वक्तव्य केले होते. 
 
 
 
 

 

बातम्या आणखी आहेत...