आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bahubali Fame Actress Anushka Shetty Birthday Special Know About Her Personal Life

ही चिमुकली आज आहे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री, 'बाहुबली' फेम प्रभाससोबत जुळले होते नाव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि  'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'बाहुबली द कनक्लुजन' या चित्रपटात आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनुष्काने सगळ्यांना भूरळ घातली होती. अनुष्का शेट्टीचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 2005 मध्ये सुपर या चित्रपटातून तिने अभिनय करिअरची सुरुवात केली होती. तिच्या कुटुंबातील कुणीही फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत नाहीये. आज अनुष्काच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात तिच्याविषयी... 

  • चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी योगा इन्स्ट्रक्टर होती अनुष्का..

7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगळूरू, कर्नाटक येथील मंगलोर येथे अनुष्का शेट्टीचा जन्म झाला. प्रफुल्ला हे तिच्या आईचे तर ए. एन. विठ्ठल शेट्टी हे अनुष्काच्या वडिलांचे नाव आहे. अनुष्का शेट्टी खासगी आयुष्यात कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहे. तिने बंगळूरुच्या माऊंट कार्मेल कॉलेजमधून बीसीए पूर्ण केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर अनुष्का शेट्टी एक प्रशिक्षित योगा शिक्षिका होती. भरत ठाकूर यांच्याकडून तिने योगचे धडे घेतले आहे. तिला दोन मोठे भाऊ आहेत. 

  • 30 हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय अनुष्काने काम...

38 वर्षांच्या अनुष्काने अनेक तमिळ आणि तेलुगु चित्रपटांत अभिनय केला आहे. बाहुबली शिवाय विक्रमरकुडु (2006), डॉन (2007), किंग (2008), शौर्यम (2008), बिल्ला (2009), अरुंधती (2009), रगडा (2010), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) आणि सिंघम-2, भागमती यासारख्या 30 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

  • अनुष्काने कमी केले 25 किलो वजन...

'साईज झिरो' हा तिच्या चर्चित सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. यासाठी तिने 20 किलो वजन वाढवले होते. तर नंतर तिने स्वतःचे वाढलेले वजन कमीदेखील केले. 'बाहुबली' या चित्रपटासाठी अनुष्काने तब्बल 25 किलो वजन कमी केले.

  • 'बाहुबली' फेम प्रभास आणि अनुष्काच्या अफेअरची होती चर्चा...

बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारी प्रभास आणि अनुष्काची जोडी खऱ्या अर्थाने बाहुबली या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात घर करुन गेली. विविध कार्यक्रमांना एकत्र गेल्यावर कॅमेऱ्यांच्या नजराही प्रभास आणि अनुष्कावरच खिळलेल्या असायच्या. या दोघांचे अफेअर असल्याची चर्चा रंगू लागली, जेव्हा आली लग्नाची बातमी... प्रभास आणि अनुष्का एकमेकांना डेट करत असून दोघे साखरपुडा करणार असल्याची बातमी काही वर्षांपूर्वी आली होती. पण त्यावेळी अनुष्का फक्त बालपणीची मैत्रीण असून आमच्यात अफेअर नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः प्रभासने दिले होते. 

  • फॅमिली फ्रेंड्स आहेत दोघे...

एका मुलाखतीत प्रभासने सांगितले होते, की गेल्या नऊ वर्षांपासून त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्यात चांगली मैत्री आहे. बाहुबली या चित्रपटाच्या यशानंतर प्रभास लवकरच लग्न करणार अशी चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे प्रभास अनुष्कासोबतच लग्न थाटणार असल्याचा अनेकांचा समज झाला होता. अनुष्कासोबतच्या नात्याविषयी प्रभास म्हणाला होता, इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याने जेव्हा रिलेशनशिपच्या चर्चा ऐकू येतात, तेव्हा खरंच मी विचार करायला लागतो की आमच्यात असं काही आहे का? पण, असं काहीच नाहीये. यात नवीन काही नाही. एकापेक्षा अधिक चित्रपटांमध्ये जेव्हा त्याच अभिनेत्रीसोबत भूमिका साकारतो तेव्हा साहजिकच लोकांमध्ये चर्चा होऊ लागतात.

  • आईवडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न थाटणार अनुष्का...

लग्नाविषयी अनुष्का म्हणते की, सध्या तिचे सगळे लक्ष करिअरवर असून आईवडिलांचे तिच्यासाठी वर संशोधनसुद्धा सुरु आहे. जेव्हा आईवडिलांना माझ्यासाठी चांगला मुलगा मिळेल, तेव्हा मी लग्न करेल. 

बातम्या आणखी आहेत...