आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंकटेशच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये प्रभासने केले पाहुण्यांचे स्वागत, नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि सून समांथा हेदेखील दिसले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद : साउथ फिल्मचे सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबती यांची मुलगी आश्रिताने शनिवारी (23 मार्च) ला जयपुरमध्ये विनायक रेड्डीसोबत लग्न केले. लग्नामध्ये सलमान खानदेखील हजर होता. लग्नानंतर व्यंकटेश यांनी 28 मार्चला हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन दिले, ज्यामध्ये बाहुबली फेम प्रभास आणि राणा दग्गुबती यांच्यासह अनेक सेलेब्रिटी दिसले. यादरम्यान प्रभास पाहुण्यांचे करत होता.  

पार्टीमध्ये पोहोचले नागार्जुनचे मुलगा आणि सून...
रिसेप्शनमध्ये नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि सून समांथा हेदेखील दिसले. यांच्याव्यतिरिक्त कमल हसन यांची मुलगी श्रुती हसनदेखील पार्टीमध्ये हजर होती. यावेळी श्रुतीने ब्लॅक ड्रेस आणि गोल्डन एक्सेसरीज परिधान केली होती. श्रुतीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले, जे तिने सोशल मीडियावरदेखील शेयर केले आहेत. 

प्रभासने केले पाहुण्यांचे स्वागत...
श्रुतीव्यतिरिक्त एक आणखी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रभास रिसेप्शनमध्ये आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना दिसत आहे. तसेच त्याच्यामागे राणा दग्गुबातीदेखील उभा आहे. यावेळी प्रभास फॉर्मल कपड्यांमध्ये दिसला. व्यंकटेश यांची मुलगी आश्रिता प्रोफेशनल बँकर आहे. आश्रितासोबतच व्यंकटेश यांना आणखी दोन मुली आहेत, त्यांची नावे हयावाहिनी आणि भावना आहे. व्यंकटेश यांनी साउथ फिल्मव्यतिरिक्त काही बॉलिवूडच्या चित्रपटांतही काम केले आहे. त्यांनी करिश्मा कपूरसोबत फिल्म 'अनाड़ी' मध्ये काम केले होते. 

बातम्या आणखी आहेत...