आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bahubali Pressures To The Director Prashant To Stop Releasing Of Film 'Jabariya Jodi'

'जबरिया जोडी' चे रिलीज थांबवण्यासाठी डायरेक्टर प्रशांतवर दवाब टाकत आहेत स्थानिक गुंड आणि नेते, येत आहेत धमकावणारे कॉल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राचा चित्रपट 'जबरिया जोडी' रिलीज होणार आहे. पण यापूर्वीच जबरदस्ती लग्न करून देणारे स्थानिक गुंड आणि नेते, चित्रपटाचे डायरेक्टर प्रशांत सिंहला धमकी देत आहेत. ट्रेलर लॉन्चनंतरच प्रशांतला अनोळखी व्यक्तींचे धमकावणारे कॉल येत आहेत. चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे.  

 

उत्तर भारतील आहे प्रशांत... 
हा चित्रपट बिहार आणि पूर्वी उत्तर प्रदेशात जबरदस्ती विवाह करून देण्याच्या परंपरेवर आधारित आहे. या मुद्यावर डायरेक्टर प्रशांत सिंहचा चित्रपट बनवण्यामागचा उद्द्येश्य ही प्रथा उजेडात आणण्याचा आहे. कारण प्रशांत स्वतः उत्तर भारतातील आहे, त्यामुळे सिद्धार्थचा रोल त्याने स्वतः डिजाइन केला आहे. तो वैयक्तिक स्वरूपातही जबरदस्ती लग्न करून देण्याचा बिजनेस करणाऱ्या अनेक स्थानिक गुंड आणि नेत्यांना ओळखतो. 

 

 

 

चित्रपटात दिसतील सत्य घटना... 
प्रशांतने सिद्धार्थ मल्होत्राचा रोल जबरदस्ती विवाह करून देणाऱ्या लोकांच्या टोळक्यांप्रमाणे डिजाइन केला आहे. त्याचे ड्रेसिंग स्टाइल, बोलणे प्रत्येक गोष्टीवर स्वतः काम केले आहे. चित्रपटातील जास्तीत जास्त दृश्ये स्थानिक गुंड आणि नेत्यांच्या सत्य घटनेने प्रेरित आहेत. मात्र प्रशांतने त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले आहे आणि चित्रपट रिलीजची तयारी करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...