आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांचा गंडा, पिता-पुत्र अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी आणि गुरुदास माळी असे या पितापुत्राचे नाव आहे.


वेचले (ता.सातारा) येथे गुप्तधनाचा साठा असून याचा शोध घेण्यासाठी यज्ञ करावा लागेल. यासाठी २ मार्च रोजी शिवाजी व गुरुदास माळी यांनी तक्रारदारांकडून ८ लाख ७३ हजार रुपये घेतले होते. मात्र, काही कारणास्तव दोघांनी यापैकी ८ लाख रुपये परत दिले. शिवाय, तक्रारदारांच्या एका मित्राकडून दोघांनी ११ लाख २० हजार रुपये घेतले. परंतु, त्यानंतर कानाडोळा करण्यास सुरूवात केली.दरम्यान, तक्रारदारांनी ही रक्कम परत मागितली असता भोंदूंनी त्यांना तंत्र-मंत्राची भीती दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पिता-पुत्रांना अटक केली आहे. त्यांनी इतरांचीही फसवणुक केली काय, याचा तपास सुरू आहे.