आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज चेतकचे पुनरागमन, ई-स्कूटरचे जानेवारीत लाँचिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  जवळपास १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा बजाज चेतकने पुनरागमन झाले आहे. कंपनीने बुधवारी या स्कूटरवरचे नवे इलेक्ट्रिक रुपडे दाखवले. 

ही कंपनीकडून सादर केली जाणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीद्वारे ती जानेवारीपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. त्या वेळी कंपनी हिच्या किमतीची माहिती देईल. कंपनीने २५ सप्टेंबर २०१९ पासून तिची उत्पादन सुरू केले आहे. बजाजने हिच्या क्लासिक डिझाइनने प्रेरित होऊन तयार केली आहे. यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांचीही उपस्थिती होती.
 
 

बजाज चेतक इलेक्ट्रिकची वैशिष्ट्ये

नियो-रेट्रो स्टायलिंग
> एलईडी हेड लँप विथ एलईडी डीआरएल
> पूर्ण डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल
> कनेक्टेड टेक्नॉलॉजी
> दोन रायडिंग मोड
> रिव्हर्स असिस्ट मोड
> फंड आणि रिअर अलॉय व्हील
> ड्रायव्हिंग रेंज : इको मोडमध्ये ९५ किमी, स्पोर्ट मोडमध्ये ८५ किमी.
> स्पर्धक : ही एथर ४५० शी स्पर्धा करेल.

बातम्या आणखी आहेत...