आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; फुल चार्जमध्ये चालेल 95+ किमी, मिळेल 3 वर्षांची वॉरंटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्कूटर पुण्यात लॉन्च; लवकरच बंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादमध्येही लॉन्च केले जाईल

ऑटो डेस्क- बजाजने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मंगळवारी आपल्या चेतक इलेक्ट्रीक स्कूटरला लॉन्च केले आहे. या नव्या स्कूटरची एक्स-शोरूम किमंत एक लाख रुपये आहे. कंपनीने याला अर्बन आणि प्रीमियम अशा दोन व्हॅरिएंटमध्ये आणले आहे. तर, सायबर व्हाइट, हेजल्नट, सिट्रस रश, वैल्यूटो रोजो, इंडिगो मेटेलिक आणि ब्रुक्लन ब्लॅक अशा 6 कलर व्हॅरिएंटमध्य आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची प्री-बुकिंग 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पण, डिलीव्हरी फेब्रुवारीमध्ये मिळेल.

95+ किलोमीटरची रेंज


बजाज चेतक इलेक्ट्रिकमध्ये 3 किलोवॉटची बॅटरी आणि 4080 वॉटची मोटर दिली आहे. ही 16Nm टॉर्क जनेरट करते. बॅटरी आणि मोटरीला IP67 रेटिंग दिली आहे, म्हणजेच ही गाडी डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. कंपनीचा दावा आहे की, 5 तासात स्कूटरची बॅटरी फूल चार्ज होते.

स्कूटरमध्ये ईको आणि स्पोर्ट असे दोन ड्राइविंग मोड आहेत. फुल चार्ज झाल्यावर ईको मोडमध्ये 95 किलोमीटरपर्यंत गाडी चालेल तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज आहे. स्कूटरसोबत चार्जर मोफत दिले जाईल तर फास्ट DC चार्जरला कंपनी तुमच्या घरी येईन इंस्टॉल करुन देईल.

अॅपवर मिळेल महत्वपूर्ण माहिती

कंपनीने स्कूटरला रेट्रो लुक दिला आहे. यात राउंड हेडलॅम्प, 12-इंच अलॉय व्हील आणि सिंगल-साइड सस्पेंशन आहे. ही देशातील मेटल बॉडी असलेली देशातील पहिली स्कूटर आहे. स्कूटरला कंपनीच्या अॅपसोबत कनेक्ट केले जाऊ शकते. त्यानंतर याची रेंज, चार्जिंग, लोकेशनसारख्या महत्वाची माहिती तुमच्या फोनवर मिळत राहील. मोबाइल अॅपमध्ये स्कूटर मोबेलिटी सॉल्यूशन, डेटा कम्युनिकेशन, सिक्योरिटी, यूजर ऑथेन्टिकेशनसाखे फीचरदेखील दिले आहेत.

रिव्हर्स गिअर आणि 3 वर्षांची वॉरेंटी

यात रिव्हर्स ड्रायविंग फीचरदेखील मिळेल. या फीचरमुळे महिलांसाठी गाडी चालवणे सोपे जाईल. बजाजने स्कूटरला सर्वात आधी पुण्यात लॉन्च केले आहे. लवकरच बंगळुरू, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरातही लॉन्च केले जाईल. कंपनी या स्कूटरवर 3 वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरेंटी देत आहे.

बातम्या आणखी आहेत...