Home | National | Other State | Bajrang Bali is my caste, his vote is for us: Mayawati

धर्म आणि जातीवर राजकारण सुरू : बजरंग बली हे माझ्या जातीचे, त्यांचे मत आम्हालाच : मायावती

वृत्तसंस्था | Update - Apr 14, 2019, 08:59 AM IST

‘याेगींच्या पक्षाला अली वा बजरंग बली यांचे मत मिळणार नाही. बजरंग बली माझ्या जातीचे आहेत

 • Bajrang Bali is my caste, his vote is for us: Mayawati

  बदायूं - अली व बजरंग बलीवर सुरू झालेल्या वादात बसप प्रमुख मायावतींनीही उडी घेतली आहे. बजरंग बली आपल्या जातीचे आहेत, असे सांगत माया म्हणाल्या- ‘याेगींच्या पक्षाला अली वा बजरंग बली यांचे मत मिळणार नाही. बजरंग बली माझ्या जातीचे आहेत. हे मी नव्हे तर स्वत: योगींनीच म्हटले होते. या निवडणुकीत अली व बजरंग बली एकत्र येत आहेत’ याआधी मायावतींनी मुस्लिमांना मत विभागणी होऊ न देण्याचे आवाहन केले होते. त्यावर उत्तरात योगींनी म्हटले होते की, सप-बसपला अलीवर तर आम्हाला बजरंग बलीवर विश्वास आहे.

  हनुमान काय हे आझम यांना रामपूरमध्ये दाखवू : गिरिराज

  भाजपचे गिरिराज सिंह म्हणाले की, ‘आझम खान यांनी आधी मोदींना शिवी दिली आणि आता आमच्या देवाला शिवी देत आहेत. मी रामपूरला जाऊन आझम खान यांना बजरंग बली काय आहेत हे दाखवेन.’

  या वक्तव्यांचा अर्थ...

  यूपीच्या ज्या आठ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान झाले, तेथे २५% वर मुस्लिम आहेत.१८ एप्रिललाही ज्या आठ जागांवर मतदान होणार आहे तेथेही २०% वर मुस्लिम आहेत. तसेच २५% वर मुस्लिम आहेत. त्यामुळे सप-बसप अलीसोबत बजरंग बलीच्या नावाशी मते जोडत आहेत.

Trending