Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Bakri Eid Namaz: 28 thousand aid received for keral flood victims

बकरी ईद नमाज: पूरग्रस्तांसाठी मिळाली 28 हजारांची मदत

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 05:39 AM IST

बकरी ईदचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डीवायएफआयच्या वतीने होटगी रोड,आसार मैदान, जूनी मिल कंपाऊंड, पानग

  • Bakri Eid Namaz: 28 thousand aid received for keral flood victims
    सोलापूर - बकरी ईदचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डीवायएफआयच्या वतीने होटगी रोड,आसार मैदान, जूनी मिल कंपाऊंड, पानगल ईदगाह व गोदुताई घरकुल याठिकाणी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते केरळ पूरग्रस्त मदत निधी संकलन केले. या वेळी मुस्लिम समाज बांधवाकडून २८,१५७ रुपये मदत निधी मिळाली.

    माकप सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने केरळ मदत निधी संकलन मोहीम सोमवारपासून सुरू आहे. दहा रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम मदत म्हणून दानशूर लोकांनी दिली. आजपर्यंत तीन लाख इतका निधी जमा झाला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत निधी संकलन चालणार आहे. माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर, जिल्हा सचिव एम एच शेख, नसीमा शेख, सिद्दप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, शेवंता देशमुख, युसूफ शेख मेजर अब्राहम कुमार आदींचा सहभाग होता.

    रॉबिनहूड आर्मीतर्फेही मदत
    केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रॉबिनहूड आर्मीने सोशल मीडियावर केलेल्या आवाहनास प्रतिसाद मिळाला. यातून कित्येक हात पुढे सरसावले. दोनच दिवसांत जमा झालेले २५० किलो हून आधिक तांदूळ, १०० किलो दाळ, तसेच तुरटी, महिलांसाठी साहित्य अशी मिळालेली मदत रेल्वेद्वारे केरळकडे रवाना केल्याची माहिती प्रा. हिंदुराव गोरे यांनी दिली. केरळमध्ये ते रॉबिनहूड आर्मी केरळ सदस्य आशुतोष गुंज हे साहित्य स्वीकारून पूरग्रस्तांपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पोहोचवणार आहेत.

Trending