आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Bala' Crosses 100 Crore Mark Became 15th Film Of 2019 Which Crossed 100 Crore Marks At Box Office

'बाला'ने ओलांडला 100 कोटींचा टप्पा, एवढी कमाई करणारा बॉलिवूडचा यंदाचा 15 वा तर आयुष्मानच्या करिअरचा तिसरा चित्रपट  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अमर कौशिक दिग्दर्शित आणि आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर, यामी गौतम स्टारर ‘बाला’ हा चित्रपट तिकीटबारीबर चांगली कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने 100.15 कोटींची कमाई केली आहे. 8 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीमध्ये येणा-या दिवसांत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर, यामी गौतम यांच्यासह सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी अगदी विहानच्या भूमिकेतील धीरेंद्र कुमार या नव्या-जुन्या कलाकारांच्या अभिनयाची साथ मिळाली आहे.

  • 100 कोटीच्या क्लबमध्ये सामील झालेला यावर्षीचा 15 वा चित्रपट..

'बाला' हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेला यावर्षीचा 15 वा आणि आयुष्मानच्या करिअरचा तिसरा चित्रपट आहे. 

  • 2019 चा 100 कोटी क्लब
क्र.फिल्मरिलीज डेटकिती दिवसांत 100 कोटी कमावले लाइफटाइम कलेक्शन
1उरी : द सर्जिकल स्ट्राइक11 जानेवारी10245.36 कोटी रुपये
2गली ब्वॉय14 फेब्रुवारी8140.25 कोटी रुपये
3टोटल धमाल22 फेब्रुवारी9154.23 कोटी रुपये
4केसरी21 मार्च7154.41 कोटी रुपये
5दे दे प्यार दे17 मे28103.64 कोटी रुपये
6भारत5 जून4211.07 कोटी रुपये
7कबीर सिंह21 जून5 278 कोटी रुपये
8सुपर 3012 जुलै10146.94 कोटी रुपये
9मिशन मंगल15 ऑगस्ट5202.98 कोटी रुपये
10साहो (हिंदी वर्जन)30 ऑगस्ट5142.95 कोटी रुपये
11छिछोरे6 सप्टेंबर12153.09 कोटी रुपये
12ड्रीम गर्ल13 सप्टेंबर11142.26 कोटी रुपये
13वॉर2 ऑक्टोबर3317.67 कोटी रुपये
14हाउसफुल 425 ऑक्टोबर5193.22 कोटी रुपये
15बाला8 नोव्हेंबर15100.15 कोटी रुपये

  • 100 कोटी क्लबमध्ये आयुष्मानचे तीन चित्रपट..
क्र.फिल्मरिलीज डेटकिती दिवसांत 100 कोटी कमावलेलाइफटाइम कलेक्शन
1बधाई हो18 ऑक्टोबर 201817137.61 कोटी रुपये
2ड्रीम गर्ल13 सप्टेंबर 201911142.26 कोटी रुपये
3बाला8 नोव्हेंबर 201915100.15 कोटी रुपये