आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतविजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्ञानेश्वरने बालाला अवघ्या सव्वा मिनिटांत चितपट करत मारली बाजी

स्पोर्ट डेस्क -  महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेता बाला रफिक शेखला पराभवाचा सामना करावा लागला. सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदडेने बालाला चितपट करत बाजी मारली आहे. बाला रफिक शेखने गतवर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. यावर्षीही त्याचं वर्चस्व या स्पर्धेवर असेल असं वाटत होतं अशातच सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदडेने बाला रफिक शेखला उपांत्य फेरीत चितपट केले.अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जमदडेने बाला रफिक शेखला चितपट केले. या पराभवामुळे बाला रफिक शेख स्पर्धेबाहेर झाला आहे. तर दुसरीकडे उपविजेता अभिजित कटके याचा देखील उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. त्यामुळे अभिजित कटके आणि बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल स्पर्धेबाहेर गेले आहेत.
]

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेची माती विभागात निवड झाली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी चिकमहूद येथील सुशील कुमार शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभाग आणि गादी विभाग व कुमार निवड चाचणीत अनेक नामवंत मल्लांनी त्यांचा खेळ आजमवला. या स्पर्धेतील माती विभागात ज्ञानेश्वर जमदडे अव्वल ठरला. त्यामुळेच त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली. जमदडेने गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी असलेल्या बाला रफिक शेखला उपांत्य फेरीत आस्मान दाखवत ही निवड त्याने सार्थ ठरवली आहे असंच दिसते आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...