Home | National | Delhi | Balakot made war chase surrounded Pakistan

युद्धनाैकांनी पाकिस्तानला वेढून घडवले ‘बालाकोट’; आयएनएस विक्रमादित्यने केले मोहिमेचे नेतृत्व

वृत्तसंस्था | Update - Apr 24, 2019, 10:03 AM IST

नाैदलाने अरबी समुद्रात सराव करत असलेल्या आपल्या आरमारात बदल केले होते

  • Balakot made war chase surrounded Pakistan

    नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर पाकमधील बालाकोट येथे हवाई दलाने एअरस्ट्राइक केला त्या वेळी नाैदलाने अरबी समुद्रात सराव करत असलेल्या आपल्या आरमारात बदल केले होते. युद्धसदृश परिस्थितीत ७२ युद्धनाैका आणि अणवस्त्रधारी पाणबुड्यांनी पाकिस्तानला वेढा घालून पाकची रसद पूर्णपणे रोखली होती. या धाडसी पराक्रमाबद्दल संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी नाैदलाच्या शूर जवानांना शाबासकी दिली. नाैदलाची ही मोहीम संरक्षणमंत्र्यांच्या नियंत्रणात झाली होती. मंगळवारी नवी दिल्लीत नाैदलाच्या कमांडरांचे तीनदिवसीय संमेलन सुरू झाले. या संमेलनात नाैदलाचे कमांडर अशा मोहिमांच्या तयारीचा आढावा घेतील. यात पूर्व किनाऱ्यावर चीनच्या तुलनेत तयारी कितपत आहे, याचाही आढावा घेतला जाणार आहे.

    आयएनएस विक्रमादित्यने केले मोहिमेचे नेतृत्व
    फेब्रुवारीत आयएनएस विक्रमादित्यच्या नेतृत्वात नाैदलाच्या ६० आणि तटरक्षक दलाच्या १२ युद्धनाैका या युद्धसरावात सहभागी झाल्या होत्या. याशिवाय एक पाणबुडी आणि ६० विमानवाहू नाैका यांचाही सहभाग होता. याद्वारे अरबी समुद्रात पाकिस्तानला वेढा देत पाकची रसद तोडली होती

Trending