आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- "स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा संघ परिवार होता का? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही," असे म्हणत शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी थेट दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर निशाना साधला.
निलेश राणे यांनी एक ट्वीट करत बाळासाहेबांवर टीका केली. ते म्हणाले की, ''स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही." राणे आणि ठाकरे घराण्याचे वैर सर्वश्रुत आहे, त्यामुळे आता शिवसेनेकडून निलेश यांच्या टीकेला काय प्रतिक्रीया येते, हे पाणे औत्सुक्याचे ठरेल.
काय आहे प्रकरण ?
शिवसेनेनं त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. ''काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला बंदी उठवताना पटेलांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, ‘‘तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.’’ ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगतेय." असे सामनातू म्हटले गेले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.