आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझरला आज बाळासाहेब ठाकरे महारोजगार मेळाव्याचे अायाेजन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागातर्फे शनिवारी (दि. २९) ओझर येथील कम्युनिटी हॉलमध्ये 'बाळासाहेब ठाकरे महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात अाला आहे. या महारोजगार मेळाव्याचे उद‌्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हाेणार आहे.

 

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, उद्योग विभागाचे मुख्य सचिव सतीश गवई, ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहे. निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या संकल्पनेतून हा मेेळावा हाेणार अाहे. 


आमदार अनिल कदम यांच्या पुढाकाराने होत असलेले या मेळाव्यासाठी सुमारे ९६७९ ऑनलाईन तर ३२११ युवकांनी ऑफलाइन अर्ज दाखल केले आहे. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद येथील १०० कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या मेळाव्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून सहभागी हाेण्याचे आवाहन आमदार अनिल कदम व उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे यांनी यांनी केले आहे. 


संधीचा लाभ घ्यावा 
या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून जिल्ह्यातील १० वी, १२ वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ते सर्व पदवीधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार अाहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. 
- अनिल कदम, अामदार, निफाड 


नाेंदणी प्रक्रिया निशुल्क 
महामेळाव्याचा हा उपक्रम हा एक वर्षभर चालणार असून आगामी तीन महिन्यांत निफाडचे आमदार अनिल कदम हे मॉडेल करियरच्या माध्यमातून वंचित व बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असून सदर नोंदणी प्रकिया निःशुल्क आहे. 
-दयाळ कांगणे, सीआयआय 


शिवसेना आमदारांच्या रोजगार मेळाव्यास मुख्यमंत्र्यांची हजेरी 
शिवसेना-भाजपची मैत्री सर्वज्ञान असताना आता शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहाणार आहे. त्यांच्या हस्ते मेळाव्या उद‌्घाटन होणार आहे. त्यानंतर ११ वाजता दिंडोरीतील सह्याद्री फार्मला भेट देणार आहे. 


शिवसेना-भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही शिवसेनेकडून नियमित विरोधाचीच भूमिका घेतली जात आहे. त्यांच्या मंत्री, आमदारांनाही दुय्यमस्थान दिले जात असल्याचा शिवसेनेकडून आरोप केला जात असताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास हजेरी लावत असल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबतही दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय असेल याचीही स्पष्टता होत आहे. सकाळी ९.३० वाजता त्याचे ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून टाऊनशिपमधील कम्युनिटी हॉल येथील रोजगार मेळाव्यास उपस्थित राहतील. ११ वाजता मोहाडी (ता. दिंडाेरी) येथील सह्याद्री फार्मला भेट दिल्यानंतर विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान करतील. त्यांच्यासोबत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार अाहेत. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...