आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन; राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शिवाजी पार्क येथे राज्यभरातून शिवसैनिक दाखल होणार आहेत. त्यामुळे शनिवारपासूनच शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क येथे तयारी सुरू करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभरात अनेक दिग्गज नेते येथे येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला भेट देऊन नतमस्तक होतात. या वर्षीच्या स्मृतीदिनाला काहीशी वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. यावेळी ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य विधानसभेत पोहोचला आहे. तर दूसरीकडे शिवसेना व भाजप यांच्यातील वाद टोकाला पोहोचेला असून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.