आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांसहित अनेक नेत्यांची दिल्ली वारी, घेतली 'या' जेष्ठ नेत्याची भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेनेत सत्तावाटपावरुन तुतू-मैमै सुरू आहे. या सर्वात काँग्रेस-राष्ट्रवादीची काय भूमिका असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. निकालानंतर राष्ट्रवादीकडून विरोधी बाकावर बसण्याची भाषा बोलली गेली, तर काँग्रेसकडून सेनेला साथ देणार असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काही नेत्यांनी दिल्लीत पक्षाचे जेष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आहे.
वेणुगोपाल यांच्यासोबतच्या भेटीबद्दल बाळासाहेब थोरातांनी म्हणाले की, "या भेटीत आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीतील आमच्या कामाविषयी माहिती दिली. सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार आम्ही वेणुगोपाल यांची भेट घेतली. आम्हाला विस्तृत चर्चा करायची असल्याने सोनिया गांधी यांनी आम्हाला वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले." तसेच, राज्यातील परिस्थितीवर आमची नजर आहे आणि सध्या “वेट अँड वॉच” ही परिस्थिती असल्याचं देखील थोरात यांनी यावेळी नमूद केलं.
या बैठकीत माणिकराव ठाकरे देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, "आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. सध्या आमचे काहीही ठरलेले नाहीये. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनाधार मिळालेला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही", असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...