आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- आज सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दणका बसला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी उद्या(27 नोव्हेंबर) सध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ भाजपला देण्यात आली आहे. यादरम्यान, उद्याची रणनिती ठरवण्यासाठी मुंबईतील जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे. यावेळी काँग्रेसची जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदी महाराष्ट्र काँग्रेसची अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. याधी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या गटनेत्याची निवड केली होती, पण काँग्रेसने आज आपला गटनेता निवडला.
Maharashtra Congress President Balasaheb Thorat elected Congress Legislative Party leader https://t.co/25hCOck7y4 pic.twitter.com/c1h7Vs4MMS
— ANI (@ANI) November 26, 2019
भाजपला 24 तासांचा अल्टीमेटम
महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात भाजपला जोरदार दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी उद्याच बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच, यात कोणतेही गुप्त मतदान होणार नाही, सर्व निकालाचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल, असेही न्यायालयाने सांगितले.
उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी भाजपला घ्यावी लागणार आहे. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांची निवडही लाईव्ह करण्यात यावी. हंगामी अध्यक्षांच्या अंतर्गत बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे आता बुधवारी सायंकाळी पाच वाजेपुर्वी सर्व आमदारांचे शपथविधी पूर्ण करुन भाजपला बहुमताची चाचणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.