आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची वर्णी, 5 नवे कार्याध्यक्ष 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची शनिवारी रात्री नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांच्यासाेबत नितीन राऊत, विश्वजित कदम, बसवराज पाटील यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला यामुळे चांगले स्थान मिळाले आहे. 


या नेमणुकांसाेबत पक्षाने विविध समित्यांची घोषणाही या वेळी केली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा राज्यात दारुण पराभव झाला होता. यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभवाचा समाना करावा लागला होता. केवळ चंद्रपुरात शिवसेनेतून आलेले बाळू धानाेरकर हे एकमेव खासदार निवडून आले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नव्या नियुक्त्यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कुठलेही स्थान देण्यात आले नाही. 


दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची १६ तारखेला जागावाटपाबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेसची अवस्था पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा जागावाटपात वरचष्मा राहील असे आता तरी दिसून येत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४ तर राष्ट्रवादीने ११४ जागा लढवल्या होत्या. मात्र, आता काँग्रेसला मागील वेळेइतक्या जागा राष्ट्रवादी सोडेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसची रणनीती काय असेल हे लवकरच स्पष्ट होईल. 


समित्यांचीही स्थापना 
रणनीती समिती - बाळासाहेब थोरात 
जाहीरनामा - पृथ्वीराज चव्हाण 
निवडणूक - बाळासाहेब थोरात 
समन्वय - सुशीलकुमार शिंदे 
प्रचार - नाना पटोले 
प्रसिद्धी - रत्नाकर महाजन 
माध्यम आणि संपर्क - राजेंद्र दर्डा 
निवडणूक व्यवस्थापन समिती - शरद रणपिसे 

बातम्या आणखी आहेत...