आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या स्मारकास भूखंड मिळत नाही हे दुर्दैव:राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इतक्या बिल्डरांना भूखंड वाटले गेले परंतु बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या भव्य स्मारकासाठी महाराष्ट्रात कुठेही व केव्हाही जागा उपलब्ध होऊ शकते, हे नाशिकमध्ये बाळासाहेबांचे देशातले पहिले स्मारक बांधून दाखवून दिल्याचेही राज या वेळी म्हणाले.  


राज ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयासंदर्भात मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांची गुरुवारी महापालिकेत जाऊन भेट घेतली. राजधानीतील अनधिकृत फेरीवाले आणि शिवाजी पार्क येथील खेळासाठी राखीव असलेल्या जागेबाबत राज ठाकरे आणि अजय मेहता यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. टेनिस आणि बॅडमिंटन खेळाच्या जागेवर मुंबईच्या महापौरांचा बंगला होऊ देणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी या वेळी दिला. 

बातम्या आणखी आहेत...