आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना निसर्गाच्या जवळ वाटावे यासाठी उभारले फुग्यांच्या आकाराच्या पारदर्शक खोल्यांचे हॉटेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- दक्षिण चीनच्या गुइलिनमध्ये बबल हॉटेल सुरू झाले असून या हॉटेलला सध्या ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. हे हॉटेल दोन डोंगरांच्या मध्ये नदीजवळ आहे. लोकांना निसर्गाच्या जवळ असल्याचा आनंद घेता यावा यासाठी हे हॉटेल पारदर्शक बनवण्यात आले. गुइलिन चीनमधील सर्वात सुंदर शहरांतील एक आहे. पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९ महिन्यांत ८ कोटी पर्यटक आले. शहराचे २० टक्के उत्पन्न पर्यटनातूनच मिळते. या शहराला चीनमधील निसर्ग पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित केले जात आहे. २०२० पर्यंत या शहरातील उत्पन्नाचा २७ टक्के भाग हा पर्यटनातून मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. नुकतीच येथे जलदगती रेल्वे सुरू करण्यात आली आहे.


या हॉटेलमध्ये २ मजली खोल्या आहेत. याला दुमजली बंगल्याप्रमाणे बनवण्यात आले आहे. यात मुक्काम केल्यास सर्व सुविधा मिळतात.

 

पुढील स्लाइडवर पाहा Photos...
 

बातम्या आणखी आहेत...