आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळू धानाेरकरांनी साेडली शिवसेनेची आमदारकी, काँग्रेसमध्ये जाणार ; भाजपचे हंसराज अहिर यांना देणार आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा- भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बाळू धानाेरकर यांनी बुधवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला. चंद्रपूर लाेकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविराेधात निवडणूक लढविण्याच्या कारणावरुन त्यांनी हे पाऊल उचलले आहे. 

 

आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे धानाेरकर हे काँग्रेसमध्ये जाऊन तिकिट मिळवण्याची दाट शक्यता आहे. अहिर यांना तुल्यबळ लढत देऊ शकेल असा उमेदवार सध्या तरी काँग्रेसकडे नसल्यामुळे त्यांनीही धानाेरकर यांना पायघड्या टाकल्याचे सांगितले जाते. गुरुवारी नवी दिल्ली येथे धानाेरकर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तिथेच त्यांचा पक्ष प्रवेश हाेऊ शकताे. जालन्यात युतीतील वाद शमला असला तरी चंद्रपूरमधील तिढा साेडवण्यात युतीच्या नेत्यांना यश आलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...