आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलुचिस्तानमधील हिंगलाज मंदिर, प्रभू श्रीरामांनी घेतले होते देवीचे दर्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हिंगलाज देवी मंदिर आहे. हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. हिंगलाज मंदिरात नवरात्रीचा जल्लोष अगदी भारतासारखाच असतो. कित्येक वेळा येथील दृश्य पाहून ते भारतातील आहे की पाकिस्तान हे समजणे कठिण काम आहे. हिंगलाज मंदिर ज्या परिसरात आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू राहतात. नवरात्री निमित्त या ठिकाणी 3 किमीच्या परिसरात जत्रा भरते. दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणी गरबा करतात. पूजा हवन होते, तसेच कन्या भोज देखील दिला जातो.

  • भगवान शंकराची पत्नी सतीचे शिर पडल्याने बनले हिंगलाज

- हिंदू धर्म शास्त्र आणि पौराणिक कथेनुसार, सतीचे वडील दक्ष आपल्या मुलीचा विवाह भगवान शंकराशी झाल्याने नाराज होते. रागाच्या भरात त्यांनी आपल्या मुलीचा खूप अपमान केला होता. यानंतर सतीने हवनकुंडमध्ये स्वतःला आग लावून घेतली. हे पाहताच शंकर गणांनी राजा दक्षचा वध केला होता. - घटनेची माहिती मिळाल्यानंतर शंकर भगवान दक्षच्या घरी पोहोचले. रागात त्यांनी सतीचा मृतदहे आपल्या खांद्यावर घेतला आणि तांडव नृत्य करायला सुरुवात केली. शंकराला शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या मृतदेहाचे 51 तुकडे केले. - हे तुकडे ज्या-ज्या ठिकाणी पडले त्या सर्व 51 ठिकाणी 51 शक्तीपीठ तयार झाले. त्यापैकीच एक भाग (शिर) किर्थर डोंगरावर पडले होते. त्याला आज हिंगलाज मंदिर म्हणून ओळखले जाते. शिर या ठिकाणी पडल्याने या शक्तीपाठाला मातेचे पहिले स्थान असेही म्हटले जाते.

  • यामुळे मुस्लिम म्हणतात 'हज'

- दरवर्षी नवरात्रीच्या 9 पैकी 2 दिवस या ठिकाणी सर्वात मोठी गर्दी पाहायला मिळते. त्या दोन दिवसांत दररोज 10 ते 25 हजार भक्त मातेच्या दर्शनासाठी येतात. यात पाकिस्तानसह, बांगलादेशी, अमेरिकन आणि ब्रिटिशांचाही समावेश आहे. - हिंगलाज मंदिरास पाकिस्तानात 'नानी बीबी की हज' किंवा दर्गाह असे मानले जाते. त्यामुळे अफगाणिस्तान, इजिप्तसह इराणमधूनही लोक या मंदिरात येतात. - उल्लेखनीय बाब म्हणजे, 2006 मध्ये भाजपचे नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी तत्कालीन लष्करशहा मुशर्रफची विशेष परवानगी घेऊन या मंदिराचे दर्शन घेतले होते.

  • प्रभू श्रीरामांनी घेतले होते देवीचे दर्शन

हिंगलाज गुहा असलेल्या परिसरात तीन ज्वालामुखी आहे. यांना गणेश, शिव आणि पार्वती नावाने ओळखले जाते. काराचीपासून जवळपास 250 किमी दूर स्थित या मंदिरात प्रभू श्रीरामांनीही दर्शन घेतले होते. याव्यतिरिक्त गुरु गोरखनाथ, गुरुनानक देव, दादा मखान यासारखे अध्यात्मिक संतही येथे येऊन गेले आहेत. हिंगलाज देवी हिंदू खत्री समुदायाची कुलदेवी आहे. एका रिपोर्टनुसार भारतामध्ये यांची संख्या 1.5 लाख असून त्यापैकी 80% राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे.