आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बटाला- पंजाबमधील बटालाजवळील तलवंडी झियुरां येथे बलवंतसिंग (६६) दररोज घोड्यासोबत दोन किमी धावतात. ते स्वत: इतके फीट आहेत की, गावापासून ३१ किमी दूर असलेल्या गुरुदासपूरपर्यंत ते अवघ्या दीड तासात धावत जातात. आजवरच्या स्पर्धांत त्यांना १०० हून अधिक पदके, प्रमाणपत्र व चषक मिळालेले आहे. त्यांच्या घोड्याला व कुत्र्याला सोबतच धावण्याची सवय आहे, इतके प्रशिक्षण त्यांचेही झालेले आहे. घोड्याला दोर बांधून पळविण्याची कुणाला गरजच भासत नाही. घोड्यासोबत धावत असल्याने लोक त्यांना बलवंत घोडा या नावाने हाक मारतात. विशेष म्हणजे, घोड्याला दोर बांधून पळवावे लागत नाहीङ. ते त्यांच्यासोबत आपोआप धावू लागतात. इतके धावत असूनही बलवंतसिंग यांना दम लागत नाही. त्यांना लहानपणापासून धावण्यात भाग घेण्याची आवड आहे. बलवंतसिंग यांनी वयाच्या १८ व्या वर्षापासून कबड्डी खेळण्यास सुरूवात केली. दहशतवादी कारवाया सुरु झाल्यानंतर कबड्डी खेळणे सोडून दिले. मुंबईतील स्पर्धेत त्यांना तिसरे स्थान मिळाले.
लहानपणी ससे, कुत्र्यांसोबत धावण्याची स्पर्धा
बलवंतसिंग म्हणाले, लहानपणी ससे व कुत्र्यांसमवेत धावण्याची स्पर्धा करत होतो. मला आता पत्नी, दोन मुली व तीन मुले आहेत. मी कितीही धावलो तरी थकवा येत नाही. आयुष्यात माणसाने थकून चालणार नाही. मग कितीही अडचणी मार्गात आल्या तरी हिंमत सोडायची नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.