आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अमरावती\'च्या बांबू प्रजातींची होणार राष्ट्रपती भवनात लागवड, २७ प्रजातींचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- भव्य अशा राष्ट्रपती भवन परिसरात भारतात असलेल्या सर्वच बांबूच्या प्रजातींची लागवड केली जाणार असून त्यापैकी २७ प्रजाती या अमरावती येथील बांबू उद्यानातून पाठवल्या जाणार आहेत. विशेष बाब अशी की या बांबूची लागवड करण्यासाठीही अमरावती येथून दोन ते तीन तज्ज्ञ राष्ट्रपती भवनात जातील. 


नागपूर बांबू बोर्डाचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी यांच्याकडे बांबू उद्यानातील २७ प्रजातींसोबतच दक्षिण भारतातील अन्य प्रजातीही राष्ट्रपती भवनात पोहोचवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या बांबूच्या विविध प्रजाती राष्ट्रपती भवनात पोहोचवणार आहेत. आम्ही नागपुरात बांबूच्या प्रजाती पोहोचवण्याची तयारी पूर्ण केली. भारत हा बांबूच्या जगभरात सर्वाधिक प्रजाती असलेल्या देशात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात बांबूच्या १३४ प्रजाती आढळतात. उत्तर पूर्वेकडील राज्यांत यापैकी बहुतांश प्रजाती आहेत. तरीही या राज्यांवर बांबू लागवडीची जबाबदारी न सोपवता. त्यांचे संरक्षण, संशोधन, विकास करणाऱ्या बांबू उद्यानाला राष्ट्रपती भवनात बांबूची लागवडीची जबाबदारी मिळाली ही अभिमानाची बाब होय, असे मत उद्यानाचे जनक सलीम खान यांनी व्यक्त केले. राष्ट्रपती भवनातील ३०० एकरवर जागेत पिवळा, हिरवा, लाल, जांभळा, काळा, भगवा अशा विविध रंगांच्या बांबूंसह देशातील वैशिष्ट्यपूर्ण बांबूंची लागवड करून त्यांचे संरक्षण केले जाणार आहे. यामुळे मुघल उद्यानासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे निमंत्रण देण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांची भेट घेतली. दरम्यान राज्यात बांबू शेतीसाठी केलेल्या कामावर चर्चा झाली. त्यावेळी राष्ट्रपती भवनात बांबू लावता येतील काय, अशी विचारणा राष्ट्रपती कोविद यांनी केली. त्यांच्या प्रस्तावाला मुनगंटीवार यांनी तत्काळ होकार िदला. त्यानंतर बांबू लावण्याची जबाबदारी राज्याच्या वन विभागावर सोपवण्यात आल्याची माहिती सलीम खान यांनी दिली. 


देशातील सर्व प्रजातींची होणार तिथे लागवड 
राष्ट्रपती भवनात भारतातील सर्व प्रजातींची लागवड करणार असून त्या गोळा करण्याचे काम वन विभागाला करायचे आहे. त्यामुळेच त्यांनी अमरावती बांबू उद्यानात मिळतील त्या बांबूच्या देशी प्रजाती मिळवल्या असून त्या नागपूर मार्गे दिल्लीकडे रवाना करणार आहेत. 


उद्यानासाठी आणखी प्रजाती मिळतील 
सध्या अमरावतीच्या बांबू उद्यानात ज्या प्रजाती नाहीत त्याही राष्ट्रपती भवनात मिळणार आहेत. त्यामुळे बांबू उद्यानातील प्रजातींच्या संख्येत वाढ होईल. आपण देशातील २७ प्रजातीचे बांबू पाठवणार आहोत.

- सलीम खान, अमरावती बांबू उद्यानाचे जनक 

 

बातम्या आणखी आहेत...