आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आंदोलनावर बंदी घाला, नुकसानीची रक्कम वसूल करा; हायकाेर्टात याचिका दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठा आंदोलनांना लागत असलेले हिंसक वळण पाहता या आंदोलनांवर प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. आतापर्यंतच्या नुकसानीची रक्कम आंदोलकांकडून वसूल करावी, अशी मागणी त्यात आहे.

 

हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे का, अशी शंका उपस्थित करत मुंबईतील अॅड. आशिष गिरी आणि द्वारकानाथ पाटील या शेतकऱ्याने ही याचिका दाखल केली. १३ ऑगस्ट रोजी सुनावणीची शक्यता आहे. अॅड. आशिष गिरी म्हणाले, आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट अाहे हे सर्वांना माहीत असूनही तोडफोड केली जात आहे. काही समाजकंटक आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हिंसा पसरवत आहेत का, याचा तपास करणेही गरजेचे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...