आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीच्या सालीचे आहेत अनेक फायदे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आहेत हे आपल्याला माहीत आहेच. नाष्टयामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची सालदेखील खूपच फायदेशीर आहे, हे कमी लोकांना माहीत असेल. तर जाणून घेऊया केळीच्या सालीचे फायदे -  > त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करू शकता. सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्यादेखील कमी होऊ लागतात. > केळीच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते. > केळीच्या सालीमधील पांढरे धागे काढून त्यात अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील. केळीची साल चामखीळवर रगडल्याने ते दबून जातात. > मधमाशीने, किड्याने दंश केल्यास त्या ठिकाणी केळीची साल बारीक करून लावल्यास आराम मिळतो. केळीच्या सालीने दात घासल्यास दात चमकतात. डोळ्याला थकवा जाणवत असेल तर केळीची साल थोडा वेळ डोळ्यावर ठेवावी.

बातम्या आणखी आहेत...