आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊ रेल्वे स्टेशनवर केळं विकण्यावर लावली बंदी, नियमांचे उल्लघंन केल्यास लागेल दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- लखनऊमध्ये रेल्वे अधिकारी केळांपेक्षा जास्त प्राथमिकता स्वच्छतेवर देताना दिसत आहेत, कारण त्यांचे असे मानने आहे की, केळामुळे रेल्वे स्टेशनवर घाण पसरते. त्यामुळेच त्यांनी रेल्वे स्टेशनवर फळांच्या विक्रीला बंदी लावली आहे. तसेच त्यांनी इशारा दिला आहे की, कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. या नियमामुळे फळं विक्रेते आणि नागरिक नाराज आहेत.

चारबाग स्टेशनवरील एका विक्रेत्याने सांगितले की, 'मी मागील 5 ते 6 दिवसांपासून स्टेशनवर केळांची विक्री केली नाहीये. प्रशासनाने याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. केळी स्वस्त असल्यामुळे गरीब नागरीक हे खरेदी करायचे, पण या निर्णयामुळे सर्व नाराज आहेत.'

लखनऊ आणि कानपूरदरम्यान रोज प्रवास करणारे अरविंद नागरने सांगितले की, "केळी खूप स्वस्त, आरोग्यास चांगले आणि सुरक्षित फळ आहे. हे अतिशच चुकीचे आहे की, केळांमुळे घाण पसरते. असे असेल तर सार्वजनिक स्वच्छालय खूप घाण असतात, त्यांच्यावरही कारवाई केली पाहीजे. पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्सवरही बंदी घातली पाहीजे."

बातम्या आणखी आहेत...