आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना डोक्यावर हेल्मेट घालून करावे लागते काम, कारण जाणून बसेल धक्का...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांदा(उत्तर प्रदेश)- येथील विज विभागाच्या एका ऑफिसमधून चकीत करणारी घटना समोर आली आहे. या ऑफिसमधील छताचे प्लास्टर निघून जात आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन येथील कर्मचाऱ्यांना डोक्यावर हेल्मेट घालून काम करावे लागत आहेत. येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याने दोन वर्षापूर्वी नोकरी जॉईन केली होती. तेव्हापासून तो डोक्यावर हेल्मेट घालून काम करत आहे. ही इमारत कधीही पडू शकते, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे काम करावे लागत आहे.
येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अनेकवेळा जिल्ह्यातील मोठ्या अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती दिली आहे. पण, अद्याप कोणीही काहीच कारवाई केली नाहीये. लिखीत स्वरुपाची तक्रार देऊनही अधिकाऱ्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालण्याचा शक्कल लढवली.

बातम्या आणखी आहेत...