आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गेच्या मूर्तीसमोरच शस्त्रत्याग! 4 अटींवर Surrender साठी झाली होती तयार फूलन देवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - बेहमाई नरसंहाराच्या 2 वर्षांनंतरही गरीबांची डाकूराणी फूलन देवी पोलिसांच्या हाती आलेली नव्हती. 1983 मध्ये तिनेच आत्मसमर्पणाची तयारी दाखवली. टोळीयुद्ध, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये गँगच्या सदस्यांचा मृत्यू आणि खराब आरोग्यामुळे तिच्यासमोर सरेंडरशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. फूलन तिला उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर मुळीच विश्वास नव्हता. त्यामुळे, पोलिसांसमोर नाही तर दुर्गेच्या आणि महात्मा गांधींच्या फोटोसमोर तिने आत्मसमर्पण केले होते. एवढेच नव्हे, तर सरेंडर करताना तिने प्रशासनासमोर 4 अटी ठेवल्या होत्या. डाकूराणीच्या सरेंडरचा साक्षीदार होण्यासाठी 10 हजारांहून अधिक समर्थकांसह 300 पोलिस जमले होते.


अट #1 
सरेंडरनंतर कुठल्याही प्रकारच्या खटल्यात आपल्याला मृत्यूदंड होणार नाही याची खात्री पटवून देणे. केवळ स्वतःलाच नव्हे, तर सरेंडर करणाऱ्या टोळीतील इतर कुठल्याही सदस्याला मृत्यूदंड दिला जाणार नाही अशी पहिली अट फूलन देवीने ठेवली होती.


अट #2
मला किंवा गँगच्या इतर सदस्याला गुन्हेगारी प्रकरणी शिक्षा झाली, तरीही ती 8 वर्षांपेक्षा जास्त कैद होऊ नये.

 

अट #3
सरेंडर करताना हातात काहीच नसलेल्या फूलन देवीने आपल्या तिसऱ्या अटीमध्ये स्वतःसाठी एक निवास मागितला होता. सरेंडरनंतर आपल्याला प्रशासनाने एक प्लॉट द्यावे अशी मागणी तिने केली होती. 


अट #4
आत्मसर्पण करताना होणाऱ्या कार्यक्रमात आपल्या समस्त कुटुंबाला आणावे. तसेच पोलिसांनी या कार्यक्रमात त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...