आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभासच्या 'साहो'साठी हैदराबादमध्ये बनवला जाईल वांद्रे-वरळी सी लिंक, विज्ञानावर आधारित रहस्यमय चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. चित्रपटासाठी नेहमी देशातील प्रसिद्ध स्थळांचा सेट उभारण्यात येतो. सध्या प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. या चित्रपटासाठी मुंबईच्या प्रतिष्ठित वांद्रे-वरळी सी-लिंकला हैदराबादमध्ये पुन्हा बनवण्यात आल्याची बातमी आहे. रामोजी राव फिल्म सिटीमध्ये या भव्य पुलाचा डुप्लिकेट बनवण्यात आला आहे. निर्माते सुरक्षिततेच्या कारणामुळे मूळ लोकेशनवर शूटिंग करू इच्छित नव्हते, असे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी हा पूल बनवण्याचा निर्णय घेतला. प्रॉडक्शन डिझायनर साबू सिरिल यांनी २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा पूल बनवला आहे. अबुधाबीच्या शूटिंगनंतर दिग्दर्शक सुजित पुढच्या आठवड्यापासून हैदराबादमध्ये चित्रपटाच्या कलाकारांसोबत शूटिंग करणार आहेत. याचे शूटिंग डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचे होते, मात्र आता निर्मात्यांनी मार्चपर्यंत डेडलाइन ठेवली आहे. चित्रपटाचे बरेच शूटिंग अबुधाबीमध्ये झाले आहे. तेथे 'साहो'च्या टीमने इंडस्ट्रीतील सर्वात महागडे अॅक्शन दृश्य शूट केल्याची चर्चा आहे. 

प्रभास सध्या आगामी चित्रपट 'साहो' चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटात तो दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषिक चित्रपट आहे, तो एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेमध्ये शूट केला गेला आहे. 

सेटवर एकमेकांना मदत करतात श्रद्धा आणि प्रभास 
प्रभास आणि श्रद्धा हिंदी, तेलगु आणि तामिळ चित्रपटांसाठी शूटिंग करत आहेत. प्रभासला तेलगु भाषेशी पूर्णपणे परिचित आहेत. म्हणूनच तो श्रद्धाला संवाद आणि शब्द सांगण्यात मदत करत असतो. त्याचप्रमाणे श्रद्धा हिंदीच्या संवादांसाठी प्रभासला मदत करत आहे. 'सोहो' हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो तीन भाषांत शूट केले गेला आहे. श्रद्धा कपूरला प्रादेशिक भाषा नवीन आहेत, तरीदेखील तिला कोणतीच अडचण आली नाही. 

या चित्रपटासाठी बनवण्यात आले चर्चित सेट 
रईस - शाहरुखच्या 'रईस' चित्रपटासाठी भव्य सेट बनवण्यात आला होता. सेट मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये तयार केला होता. येथे ८०च्या दशकातील अहमदाबादमधील गल्ली आणि वस्ती दाखवण्यात आली होती. 
झीरो -आनंद एल रायने 'झीरो' साठीदेखील मुंबईत मेरठ शहरातील घंटाघर आणि रस्ते रिक्रिएट केले होते. 
मंटो- नवाजुद्दीनच्या 'मंटो'साठी पाकिस्तानचा सेट अहमदाबादमध्ये उभारण्यात आला होता. आर्ट डायरेक्टर रिता घोषने तो बनवला होता. 
केदारनाथ - सुशांत सिंह राजपूत स्टारर या चित्रपटासाठी मुंबईतच केदारनाथ मंदिरापासून ते फेमस रामबाड़ा गावापर्यंत सेट रिक्रिएट केला होता. 
पानिपत- आशुतोष गोवारीकरने आागामी 'पानिपत' चित्रपटासाठी शनिवारवाडा रिक्रिएट केला होता. 
लखनऊ सेंट्रल- फरहान अख्तरच्या 'लखनऊ सेंट्रल' चित्रपटासाठी लखनऊ सेंट्रल तुरुंगाचा सेट मुंबई फिल्मसिटीमध्ये लावण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...