आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगळुरू बुल्सने पटकावला पहिल्यांदा प्राे कबड्डी चषक; 38-33 अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बंगळुरू बुल्स संघ शनिवारी सहाव्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये चॅम्पियन ठरला. या संघाने फायनलमध्ये गुजरात सुपरजायंट्सचा पराभव केला. बंगळुरू बुल्स संघाने ३८-३३ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. पवन सराहत (२२) याने सरस खेळी करून बंगळुरूला विजेतेपद मिळवून दिले. यासह बंगळुरू संघाला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या किताबावर नाव काेरता आले. यासाठीची टीमची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळे संघाचे विजेतपेद मिळवण्याचे स्वप्न साकारले गेले. या स्पर्धेचा किताब जिंकणारा बंगळुरू हा चाैथा नवा संघ ठरला. 

 

विजेतेपद पटकावणाऱ्या बंगळुरू संघाला तीन काेटी आणि चषक देऊन गाैरवण्यात आले. गुजरातचा संघ १ काेटी ८० लाख रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. बंगळुरूने दुसऱ्या सत्रात उपविजेतेपद पटकावले हाेते. आता सरस खेळी करताना संघाने किताब जिंकण्याचा पराक्रम गाजवला.