IPL / बंगळुरू-राजस्थान संघाचा सामना पाण्यात; दाेन्ही संघांना मिळाला प्रत्येकी एक गुण

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द; राजस्थानच्या अाशा कायम

वृत्तसंस्था

May 01,2019 09:21:00 AM IST

बंगळुरू - मुसळधार पावसाच्या व्यत्ययामुळे आयपीएलमध्ये यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान राॅयल्स यांच्यातील रंगतदार सामना रद्द झाला. पावसामुळे सामन्याला रात्री उशिरा सुरुवात झाली. दरम्यान, सामना पाच षटकांचा ठेवण्यात आला. यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकांत ७ बाद ६२ काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने ३.२ षटकांत एका गड्याच्या माेबदल्यात ४१ धावा काढल्या. दरम्यान, पुन्हा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यातून दाेन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

काेहलीच्या नेतृत्वाखाली यजमान बंगळुरू संघाने शानदार खेळी करताना पाच षटकांत ७ गड्यांच्या माेबदल्यात ६२ धावा काढल्या. बंगळुरू संघाकडून कर्णधार काेहलीने सर्वाधिक २५ धावांची खेळी केली. त्याने ७ चेंडूंमध्ये एक चाैकार आणि तीन षटकारांच्या आधारे ही खेळी केली. डिव्हिलियर्सने १० धावांचे याेगदान दिले.

पावसाचा व्यत्यय : बंगळुरू येथील मैदानावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामन्याला रात्री उशिरा ११ वाजता सुरुवात करण्यात आली.

X
COMMENT