आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bangladesh Highest Score In World Cup, They Lost To Africa After 12 Years In World Cup

बांगलादेश संघाचा वनडेत सर्वात माेठा स्काेअर; १२ वर्षांनंतर विश्वचषकात द. आफ्रिकेचा केला पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात ३११ धावांंची लूट करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची गाेलंदाजी रविवारी बांगलादेशविरुद्धही फ्लाॅप ठरली. विश्वचषकात पहिला सामना खेळत असलेल्या बांगलादेश संघाने शानदार विजयी सलामी दिली. या संघाने रविवारी २१ धावांनी आफ्रिकेवर मात केली. यासह आफ्रिकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. यासह बांगलादेशने १२ वर्षानंतर विश्वचषकात आफ्रिकेचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात ३३० धावांची खेळी केली.  प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला ३०९ धावांपर्यंत मजल मारता आली.    


बांगलादेश संघाने वनडेमध्ये सर्वात माेठ्या स्काेअरची नाेंद  केली. यापूर्वी, बांगलादेशच्या नावे ३२९ धावसंख्येची नाेंद हाेती. हा स्काेअर बांगलादेशने २०१५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध केला हाेता. नाणेफेक जिंकून  आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इक्बाल (१६) व साैम्यने (४२) अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली.   

 

टर्निंग पॉइंट
> ताहिरच्या पहिल्या स्पेलच्या तिसऱ्या आेव्हरमध्ये बळी न देणे हा माेठा टर्निंग पाॅइंट ठरला. यामुळे  गाेलंदाजांवर दबाव. यातून शाकिब व मुशफिकुरची माेठी भागीदारी.
> शेवटच्या  ५ षटकांपैकी प्रत्येकी दाेन रबाडा व माॅरिस आणि एक फेहलुकावायाेने टाकले. तरीही बांगलादेशने यादरम्यान ५९ धावांची कमाई केली.
> एनगिडीची दुखापत बांगलादेश संघाच्या पथ्यावर पडली. त्याने चार षटकेच गाेलंदाजी केली. मात्र, बळी घेण्यात ताे अपयशी ठरला. 
> डुप्लेसिस वगळता इतर सर्वच फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्याने अर्धशतक ठाेकले. 


डेटा पॉइंट
> शाकिब (615) व मुशफिकुरने वर्ल्डकपमध्ये बांगलादेशकडून सर्वात माेठी १४२ धाावंची भागीदारी केली. आेव्हरआॅल वनडेत या दाेघांची पाचवी भागीदारी ठरली..
> शाकिब (६१५) व मुशफिकुर (५८८) हे विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारे आशियाई खेळाडू. यापाठाेपाठ विराट काेहली (५८७) आणि धाेनी (५०७) आहेत.
> ओवरऑल वनडेमध्ये या दाेघांची पाचवी भागीदारी ठरली. 
> इम्रान ताहीर १०० वा वनडे खेळला.  या १०० सामन्यात त्याच्या नावे १६६ विकेटची नाेंद आहे. 
> मुस्तफिजुरने धारदार गाेलंदाज करत आता तीन विकेट घेतल्या. 

बातम्या आणखी आहेत...