अंडर-19 वर्ल्ड कप / बांग्लादेशी खेळाडूंनी सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना केली धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

  • अंडर-19 बांग्लादेशी टीमने भारताला फायनलमध्ये 3 विकेट्सी पराभूत केले

दिव्य मराठी वेब टीम

Feb 10,2020 07:38:07 PM IST

स्पोर्ट डेस्क- विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर बांग्लादेशच्या अंडर-19 क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंसोबत गैरवर्तन केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार अकबर अलीने या घटनेवर दुखः व्यक्त केले आहे. तो म्हटला की, "खेळाडू भावूक होते आणि जे झाले, ते व्हायल नको होते." दक्षिण आफ्रीकाच्या पोश्चफेस्ट्रूममध्ये रविवारी झालेल्या सामन्यात बांग्लादेशने भारताला 3 विकेट्सने पराभूत करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.

दक्षिण आफ्रीकेचा माजी क्रिकेटर जेपी डुमिनीने सामन्यानंतरचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यात दिसत आहे की, विजयानंतर बांग्लादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंमध्ये घुसून गैरवर्तन करत अपशब्दाचा वापर करत आहेत. त्यानंतर मैदानावरील अंपायरने दोन्ही संघांना दूर केले. सोशल मीडियावर बांग्लादेशी खेळाडूंच्या वर्तनाची निंदा होत आहे.


बांग्लादेशचे वर्तन चुकीचे- प्रियम

भारतीय कर्णधार प्रियम गर्गने या घटनेची निंदा केली आहे. त्याने स्पोर्ट्स वेबसाइट ईएसपीएन क्रिकेइन्फोशी बातचीत दरम्यान सांगितले की, ‘‘आम्ही सर्व नॉर्मल होतोत. जय-पराजय खेळाचा भाग आहे. कधी तुम्ही जिंकता तर कधी हारता. पण, त्यांचे वर्तन चुकीचे होते. असे व्हायला नको होते."


X