आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नाला पैसा गोळा करण्यासाठी भावाने फोडले ATM, लातूरच्या तरुणाचा पुण्यात नसता 'उद्योग'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बहिणीच्या लग्नासाठी पैसे मिळवण्यासाठी लातूर येथून एका तरुणाने पुण्यात येत शहरातील बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. विशाल रमाकांत चाबुकस्वार (21, रा. निलंगा, शिवाजीनगर, जि.लातूर) असे आरोपीचे नाव आहे.   


धानोरी बीट मार्शलचे पोलिस कर्मचारी वासुदेव खाडे व गणेश इथापे हे रात्री गस्त घालत असताना 13 मार्च रोजी रात्री अडीचच्या सुमारास पॅलेडियम होम सोसायटी धानोरी येथे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये ठोकल्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी एटीएममध्ये जाऊन पाहिले असता एक तरुण एटीएमचा खालील भागाचा पत्रा उचकटून आतील भाग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रसंगावधान राखत पोलिसांनी एटीएमचा बाहेरील काचेचा दरवाजा दाबून धरत पोलिस पथकाला बोलावून घेतले. अतिरिक्त पोलिस मदत आल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक स्क्रू ड्रायव्हर, वायर कापण्याची कटर मशीन, एक मोबाइल फोन असा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, बहिणीच्या लग्नाला पैसे कमी पडत असल्याने एटीएमची तोडफोड करून पैसे लंपास करण्याचा उद्देश होता, अशी कबुली आरोपीने दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...