आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cheater Wife ला म्हणाला होता, तू मला मारशील; BF सोबत लग्नासाठी कोर्टातही घेऊन गेला, तरीही झाला खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - ती वारंवार दगा देते होती आणि तो नेहमीच तिला माफ करायचा. पत्नीला प्रियकरासोबत तीनदा पकडल्यानंतरही त्याने तिला माफ केले. एवढेच नव्हे, तर आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकरासोबत लावून देण्यासाठी सुद्धा तो तयार झाला. त्या दोघांना लग्नासाठी तो कोर्टात देखील घेऊन गेला. परंतु, प्रियकर पोहोचला नाही. एवढे करूनही वैतागलेल्या पतील आपला मर्डर होणार याची चाहुल लागली होती. "तू मला घटस्फोट देणार नाहीस आणि प्रियकरासोबत लग्नही करणार नाहीस. तू माझी हत्या करशील." असे त्याने पत्नीला म्हटले होते. या वादाच्या ठीक 6 महिन्यांनंतर पत्नीने शार्पशूटर लावून पतीचा खून केला. 


लग्नाच्या वेळी 12 पास नव्हती, पतीने MA पर्यंत शिकवले...
2004 मध्ये येथे राहणाऱ्या रोशनलालने आपल्यापेक्षा 6 वर्षांनी लहान निर्मलासोबत विवाह केला. लग्नाच्या वेळी ती फक्त 11 पर्यंत शिकली होती. विवाहानंतर पती रोशनलालनेच तिचे पुढील शिक्षण सुरू केले. तसेच MA पर्यंत शिकवले. सोबतच तिला फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा देखील करायला लावला. 14 वर्षांच्या वैवाहिक जीवना रोशनलालने तिला काहीच कमी केले नाही. तिला घरातील कामकाज सुद्धा करू देत नव्हता. आपल्या पत्नीला त्याने राणी बनवून ठेवले होते. बँक मॅनेजर राहिलेल्या रोशनलालची जेथे पोस्टिंग झाली, तेथे तो आपल्या पत्नीला घेऊन जायचा. 8 वर्षांपूर्वी जयपूरमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर त्याने येथेच घर देखील बनवले. दोघांनी एकाच दिवशी गृहप्रवेश केला. त्या दोघांनी आपल्या दोन मुलींचे चांगल्या शाळेत अॅडमिशन केले. 


तरीही दिला दगा, , असा आला दोघांत तिसरा...
घराजवळ उमेश आणि त्याची पत्नी राहत होते. 2016 मध्ये घरात एकटी असताना उमेशची पत्नी फोन करून निर्मलाला आपल्या घरी बोलवायची. याच दरम्यान उमेश आणि रोशनलालसह कॉलोनी 4 कपलने शिमला फिरण्याचा प्लॅन केला. शिमला टूरमध्ये सगळेच कुटुंबीय एकमेकांचे चांगले मित्र झाले. परंतु, उमेश आणि निर्मला यांच्यात अधिक जवळिकता आली. शिमल्यात सुरू झालेला अफेअर जयपूरला परतल्यानंतर आणखी उफाळून आला. त्याच वर्षी निर्मलाच्या भावाचा मृत्यू झाला. यात उमेशला निर्मलाच्या आणखी जवळ येण्याच्या बहाणाच मिळाला. तो आपल्या कुटुंबासह निर्मलाच्या घरी पोहोचला आणि तिचे सांत्वन करायला लागला. याच बहाण्याने निर्मलाची वारंवार भेट घेऊन त्याने इमोशनल आधार देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही हे दोघे लपून एकमेकांची भेट घेत होते. यानंतर खुलेआम सर्वांसमोर फिरण्यास सुरुवात केली. 


पहिला दगा
रोशनला उमेश आणि निर्मला यांच्यात अनैतिक संबंधांची माहिती सर्वप्रथम उमेशच्या पत्नीनेच दिली होती. दुसऱ्या दिवशी पतीला निर्मलाचा नवीन फोन दिसला. विचारल्यावर आपल्याला हा फोन उमेशने गिफ्ट केल्याने निर्मलाने सांगितले. रोशनने पत्नीच्या फोनचा लॉक काढायला लावला. तेव्हा निर्मला आणि उमेश यांच्यातील अतिशय खासगी संवाद रोशनला दिसून आले. तोपर्यंत रोशन आणि निर्मला यांना 3 मुले-मुली होत्या. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्याने निर्मलाला माफ केले. तसेच उमेश आणि पत्नीच्या लग्नासाठी तयारही झाला. रोशन आपल्या पत्नी आणि तिच्या प्रिकराच्या लग्नासाठी तयार झाला. त्याने पत्नीला कोर्टात लग्नासाठी नेले. परंतु, उमेश त्या दिवशी पोहोचलाच नाही. 


दुसरा दगा
कोर्टातून परतल्यानंतर निर्मलाने उमेशला बोलणार नाही असे निर्णय घेतला. परंतु, काही दिवसांतच दोघांनी पुन्हा गुप-चुप चॅटिंग सुरू केले. पुन्हा भेटी देखील सुरू झाल्या. एक दिवस रोशनने दोघांना रंगेहात पकडले तेव्हा उमेश आपल्यावर बळजबरी करत असल्याचा आरोप पत्नीने लावला. यावर आपण पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करू असे रोशनने तिला सांगितले. निर्मला पतीला घेऊन पोलिस स्टेशनला सुद्धा पोहोचली. परंतु, तक्रार दाखल करण्याच्या ऐनवेळी ती पलटली. यानंतर आपण कधीच उमेशला भेटणार नाही अशी खोटी शपथ घेतली. तरीही रोशनने तिला माफ केले आणि घरी घेऊन आला. 


मग, तिस-यांदा दिला दगा
पोलिस स्टेशनवरून परतल्यानंतर काही दिवस निर्मला सामान्य होती. आपल्या पतीसमोर सुधरल्याचे नाटक केले. पण, पुन्हा आपला खरा रंग दाखवला आणि उमेशला भेटण्यास सुरुवात केली. एका वर्षानंतर ती आपल्या अडीच वर्षाच्या बाळाला घेऊन उमेश सोबत पळून जाण्यासाठी घरातून निघाली. शहरातच काही अंतरावर तिने उमेशची भेट घेतली आणि एका नातेवाइकाकडे गेली. रोशनला आपली पत्नी पळून गेल्याचा पत्ता लागला. यानंतर तो पुन्हा निर्मलाला समजावून आणि माफ करून घरी घेऊन आला. 


6 महिन्यांपूर्वी आला होता मृत्यूचा अंदाज
पती रोशनलालने वारंवार समजावून सांगितल्यानंतरही निर्मलाने उमेशला सोडले नाही. सहा महिन्यांपूर्वी दोघांमध्ये उमेशवरून जोरदार भांडण झाले. याच दरम्यान रोशन पत्नीला म्हणाला, "तू मला घटस्फोट देत नाहीस. उमेशसोबत लग्न देखील करणार नाहीस. मला माहिती आहे, की तू माझी हत्या करशील." शेजाऱ्यांनी हा संवाद ऐकला होता. त्यांनी पोलिसांना याबद्दल सांगितले.


दिवस-रात्र क्राइम सीरियल पाहून रचला षडयंत्र
निर्मला घरात असताना नेहमीच क्राईम पॅट्रोल किंवा सावधान इंडिया पाहत होती. एकटी असताना तिने अशाच प्रकारचे सीरियल पाहून पतीच्या हत्येचा कट रचला. यासाठी आपला प्रियकर उमेशला सुद्धा तयार केले. उमेशने रोशनच्या हत्येसाठी आपल्या छोट्या भावाला सुपारी देण्यास सांगितले. 


शार्प शूटरसह 5 आरोपींना अटक
याच हत्याकांडातील शार्प शूटर शूटर पप्पूला पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या फिरोझाबाद येथून मंगळवारी अटक केली आहे. या घटनेतील इतर दोन आरोपी राहुल आणि उमेशचा भाचा मनीष फरार आहेत. दरम्यान मंगळवारी आरोपी निर्मला उर्फ नीरू, प्रियकर उमेश शर्मा, महेन्द्र प्रताप सिंह उर्फ टिटू, आकाश रावत आणि शिवकांत उर्फ लालू या चौघांना कोर्टात हजर करण्यात आले. त्या सर्वांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...