Home | Maharashtra | Vidarva | Amravati | Bank of Maharashtra charges 8.40 lakh rupees: FIR filed in cyber police station

‘बँक आॅफ महाराष्ट्र’ला 8.40 लाख रुपयांचा गंडा:सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी | Update - Nov 07, 2018, 10:54 AM IST

बँक अधिकाऱ्याने केवळ एका ईमेलच्या आधारे सदर रक्कम ट्रान्सफर केली.

  • Bank of Maharashtra charges 8.40 lakh rupees: FIR filed in cyber police station

    अमरावती - एका ठकाने बँक ऑफ महाराष्ट्राच्या राठीनगर शाखेत फोन करून शहरातील एका नामांकित व्यापाऱ्याचे नाव वापरून एका व्यक्तीला ८ लाख ४० हजार रुपयांची ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम ट्रान्सफर करण्याची विनंती बँक अधिकाऱ्यांना केली. या वेळी बँक अधिकाऱ्याने केवळ एका ईमेलच्या आधारे सदर रक्कम ट्रान्सफर केली. मात्र काही वेळातच ज्या व्यापाऱ्याच्या खात्यातून रक्कम कमी झाली, त्याने बँकेसोबत संपर्क करून सदर रक्कम आपण ट्रान्सफर करायला सांगितली नव्हती. हे स्पष्ट झाल्यावर बँकेची फसगत झाल्याचे अधिकाऱ्यांना लक्षात आले. या प्रकरणी राठी नगर शाखेचे व्यवस्थापक विलास खंडारे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात ईमेल, मोबाइल धारकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.


    सोमवारी दुपारी बँकेच्या दूरध्वनीवर एका व्यक्तीचा फोन आला व त्याने स्वत:चे नाव प्रवीण कुमार चांडक असे सांगितले. प्रवीण कुमार चांडक यांचे या शाखेत कॅश क्रेडिट अकाउंट अाहे. प्रवीण कुमार चांडक व कृष्ण कुमार चांडक यांचे राहाटगाव परिसरात चारचाकी वाहनाचे शोरूम आहे. हा कॉल उपव्यवस्थापक अनुभा सिन्हा यांनी घेतला असता,समोरच्या व्यक्तीने मला तातडीने एका व्यक्तीला रक्कम पाठवायची आहे, मी सद्या शहराबाहेर असून माझ्याकडे चेकबुक नाही. त्यामुळे तुम्ही ही रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे ट्रान्सफर करून द्या. त्यावर सिन्हा यांनी आपल्या लेटरहेडवर तसे एक पत्र आम्हाला द्या,असे सांगितले.

    पत्र आपल्याला साडेचार वाजेपूर्वी बँकेत मिळेल,असे सांगून एक ईमेल पाठवून रक्कम ट्रान्सफरची विनंती केली. या ईमेलच्या आधारे बँकेने ८ लाख ४० हजार ३७० रुपयांची रक्कम दिल्लीच्या प्रीतविहारमधील बंधन बँकेच्या खाते क्रमांकावर ‘आरटीजीएस’ केली.

Trending