Home | Maharashtra | Pune | bank Officer has filed a ransom case in Pune

वेबसाईटवरून महिलेशी मैत्री..दोनदा झाले शरीरसंबंध, ठरलेले पैसे दिल्यानंतर यासाठी केले ब्लॅकमेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2019, 12:09 AM IST

पैसे दिले नाही तर तुझी पत्नी व सासर्‍याला सर्व सांगेन. एवढेच नाही तर बॅंकेत येऊन गोंधळ घालेल, अशी धमकी दिली

  • bank Officer has filed a ransom case in Pune

    पुणे- वेबसाईटवरून महिलेशी मैत्री करणे, तिच्यासोबत दोनदा शरीरसंबं प्रस्तापित करणे पुण्यातील एका बॅंक अधिकार्‍याला चांगलेच महागात पडले आहे. बॅंक अधिकार्‍याने महिलेला ठरलेले पैसे दिले. त्यानंतरही तिने या संबंधाची वाच्यता पत्नी आणि सासर्‍याकडे करण्‍याची धमकी देत 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. शेवटी 10 हजार रुपयांत तडजोड केल्यानंतर आता पीडित बॅंक अधिकार्‍याने पोलिसांत धाव घेतली आहे.

    काय आहे हे प्रकरण?

    पोलिसांनी सांगितले की, पीडित बँक अधिकारी हे चिंचवड येथील राहणारा आहे. एका वेबसाईटवर पीडित व्यक्तीची सुरींद्रा नामक एका 27 वर्षीय महिलेशी फ्रेंडशीप झाली होती. पिंपळे गुरुव परिसरात राहाते असे तिने सांगितले होते. तिला अडीच हजार रुपये देऊन पीडित व्यक्तीने तिच्याशी दोनदा शरीर संबंध ठेवले होते. त्या बदल्याने त्याने तिला पैसेही दिले होते. परंतु एके दिवशी महिलेने त्याला व्हॉट्‍सअॅपवर मेसेज केला. 50 हजार रुपयांनी मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझी पत्नी व सासर्‍याला सर्व सांगेन. एवढेच नाही तर बॅंकेत येऊन गोंधळ घालेल, अशी धमकी दिली. अखेर व्यक्तीने तिच्याशी 10 हजार रुपये देऊन तडजोड कडून स्वत:ची सुटका करून घेतली. नंतर थेट पोलिस स्टेशन गाठून पोलिसांसमोर आपबिती सांगितली.

Trending