Home | Maharashtra | Mumbai | banker turned politician meera sanyal has died from cancer in Mumbai

मीरा सान्याल: बॅंकर ते राजकारणी, मुंबई 26/11च्या हल्ल्यानंतर आयुष्याला दिले वेगळे वळण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:10 AM IST

मीरा यांनी बँकींग क्षेत्रात 30 वर्षे सेवा दिली. मुंबईवरील 26/11 या दहशतवादी हल्ल्याने मीरा प्रचंड दु:खी झाल्या होत्या.

 • banker turned politician meera sanyal has died from cancer in Mumbai

  मुंबई- रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंडच्या माजी सीईओ आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या मीरा सान्याल यांचे शुक्रवारी (ता.11) रात्री 8 वाजता मुंबईत निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्या कर्करोगाशी लढत होत्या. मात्र, त्याच्यावर मृत्यूने मात केली.

  मीरा यांनी बँकींग क्षेत्रात 30 वर्षे सेवा दिली होती. मुंबईवर झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याने मीरा प्रचंड दु:खी झाल्या होत्या.त्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला होता. मीरा या अल्पावधीत मुंबईतील आम आदमी पक्षाचा मोठा चेहरा बनल्या होत्या. मीरा सान्याल या कायम आम आदमीच्या अधिकारासाठी लढल्या. समाजसेवेसाठी त्यांनी रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंडची नोकरीचाही त्याग केला होता.

  वाचा मीरा सान्याल याचा जीवनप्रवास..
  मीरा सान्याल यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1961 रोजी केरळमधील कोचीमध्ये झाला होता. त्यांचे वडील भारतीय नौदलात अधिकारी होते. अर्थशास्त्र हा मीरा याचा आवडता विषय होता. मुंबईतील सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्‍ड इकोनॉमिक्समधून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली. INSEAD मधून त्यांनी एमबीए केले आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हॉस्ड मॅनेजमेंटचा प्रोग्राम केला.

  30 वर्षे बँकींग क्षेत्रात काम केले. देशासह विदेशातीही सेवा दिली. आशियासाठी ABN Amro च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम केले. नंतर रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पद भूषविले. मात्र, 2013 मध्ये मीरा यांनी बॅंकेची नोकरी सोडली. त्यांचा राजकारणाची आवड होती. नंतर मीरा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...26/11 च्या हल्ल्यानंतर बदलले जीवन


 • banker turned politician meera sanyal has died from cancer in Mumbai

  26/11 च्या हल्ल्यानंतर बदलले जीवन
  मीरा सान्याल या बॅंकेच्या दुनियेत प्रचंड व्यस्त होत्या. परंतु 2008 मध्ये मुंबईत झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याने त्या देखील हादरल्या होत्या. या हल्ल्याने मीरा यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. सरकारच्या बेजबादार पणाचे हे फळ होते, असे त्या म्हणाल्या होत्या. देशाला स्वच्छ राजकारण अपेक्षित आहे, यासाठी मीरा कायम आग्रही होती. नंतर देशात एकापाठोपाठ एक घोटाळे समोर आले. बँकींगमधून ब्रेक घेऊन मीरा यांनी 2009 मध्ये दक्षिण मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक ल‍ढविली. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... दक्षिण मुंबईतून दिले 'आप'ने तिकीट

 • banker turned politician meera sanyal has died from cancer in Mumbai

  दुसरीकडे, आम आदमी पक्ष स्थापन झाला. 2013 मध्ये दिल्लीत आपचे सरकार स्थापन झाले. मीरा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. पती आशीष जे सान्याल यांनी देखील पक्षाचे कॅंपेन केले.

   

  दक्षिण मुंबईतून दिले 'आप'ने तिकीट
  आम आदमी पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मीरा सान्याल यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली होती. परंतु दुसर्‍यांदाही मीरा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु लाखो लोकांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली होती.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. मीरा सान्याल यांचे फोटो..

 • banker turned politician meera sanyal has died from cancer in Mumbai
 • banker turned politician meera sanyal has died from cancer in Mumbai

Trending