आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Banking Scam Increased By 268% In 5 Years, Government Banks Accounted For 90% In 2019

5 वर्षांत बँकिंग घोटाळा 268% वाढला, 2019 मध्ये 90% वाटा सरकारी बँकांचा, वित्तीय वर्ष 2018-19 मध्ये एकूण बँकिंग घोटाळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 74% जास्त

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • रिझर्व्ह बँकेने ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया 2018-19 च्या अहवालात दिली माहिती
  • अहवालानुसार, या अवधीत बँकिंग घोटाळ्यांची संख्या 4,639 वरून वाढून 6,801 झाली

​​​​​नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत बँकिंग घोटाळ्यात २६८ टक्के वाढ झाली आहे. वित्त वर्ष २०१४-१५ मध्ये बँकांनी एकूण १९,४५५ कोटी रुपयांच्या बँकिंग घोटाळ्यांची माहिती दिली होती. २०१८-१९ मध्ये हा वाढून ७१,५४३ कोटी रुपयांचा झाला. रिझर्व्ह बँकेने आपल्या ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया २०१८-१९ अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, या अवधीत बँकिंग घोटाळ्यांची संख्या ४,६३९ वरून वाढून ६,८०१ झाली आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये झालेल्या बँकिंग घोटाळ्याच्या एकूण संख्येत सरकारी बँकांचा वाटा ५५.४ टक्के आहे. रकमेच्या आधारावर पीएसयूचा हिस्सा ९१.६ टक्के आहे. वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये झालेल्या एकूण बँकिंग घोटाळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७४% जास्त आहे. २०१७-१८ मध्ये एकूण ४१,१६७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला, तो २०१८-१९ मध्ये वाढून ७१,५४३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. २०१८-२०१९ मध्ये सर्वात जास्त घोटाळा कर्ज आणि ऑफ शीट बॅलन्स सेक्शनमध्ये झाला आहे.
ऑफ बॅलन्स शीट - हा विभाग घोटाळ्याच्या प्रकरणात दुसरा आहे. वित्त वर्ष २०१४-१५ मध्ये या विभागात एकूण ६९९ कोटी रुपयांचे १० घोटाळे झाले. २०१८-१९ मध्ये हे वाढून ५,५३८ कोटी रुपयांचा आणि संख्या ३३ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तिप्पट वाढ झाली. या विभागात २०१७-१८ मध्ये १६,२८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता.

  • एकूण - रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, बँकिंग घोटाळा वर्ष २०१५-१६ वगळता दरवर्षी वाढतो. गेल्या पाच वर्षांत बँकिंग घोटाळ्याच्या आधारावर ४७% व रकमेच्या आधारावर २६८% वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत घोटाळ्यात ७४% वाढ झाली आहे.
  • कर्ज - या श्रेणीत सर्वात जास्त रकमेच्या घोटाळ्याची माहिती दिली आहे. वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये बँकांनी एकूण ६४,५४८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची रिपोर्टिंग केली. २०१४-१५ मध्ये ही रक्कम १७,१२२ कोटी रुपये होती. म्हणजे, गेल्या पाच वर्षांत या श्रेणीत २६८% वाढ झाली आहे.
  • कार्ड/ इंटरनेट - गेल्या पाच वर्षांत कार्ड किंवा इंटरनेट घोटाळ्याची रक्कम ३६% वृद्धीसह ५२ कोटींवरून वाढून ७१ कोटी रुपये झाली. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या विभागात घट आली आहे. २०१७-१८ मध्ये ११० कोटी रुपयांचे २,०५९ घोटाळे झाले.
बातम्या आणखी आहेत...