आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Banks Can Not Send Bouncers, Recovery Agents For Recovery Of Loans: Minister Of State For Finance Anurag Thakur

कर्जाच्या वसुलीसाठी बँका बाउन्सर, वसुली एजंट पाठवू शकत नाहीत : अर्थ राज्यमंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्जवसुलीसाठी अनेकदा बँकांच्या वतीने बाउन्सर किंवा रिकव्हरी एजंट पाठवण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियम आहेत. त्यानुसार कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना बाउन्सर किंवा रिकव्हरी एजंट पाठवण्याचा अधिकार नाही. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत ही माहिती दिली.]


ठाकूर यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट दिशानिर्देश आहेत की, योग्य पोलिस तपास आणि इतर संबंधित औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच बँका पैसे वसूल करण्यासाठी एजंट पाठवू शकतात. त्यांनी प्रश्नोत्तरादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, कोणत्याही बँकेकडे कर्जाची जबरदस्ती वसुली करण्यासाठी बाउन्सर नियुक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. ठाकूर यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने “गाइडलाइन ऑन फेअर प्रॅक्टिस कोड फाॅर लेंडर्स’ (कर्जदात्यांसाठी निःपक्ष व्यवहार नियमावर दिशानिर्देश) जारी केलेले आहेत.