आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील एक वर्षात बँकांच्या फसवणुकीत ७४% वाढ, एकूण ७१ हजार कोटींची लूट; रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल जारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशात मागील एक वर्षात बँकांच्या फसवणुकीच्या प्रकरणात १५ % वाढ झाली आहे, तर फसवेगिरीतील रक्कम ७३.८ % वाढून ७१,५४२.९३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. फसवेगिरीची एकूण ६८०१ प्रकरणे समोर आली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून हे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अहवाल जारी केला. अहवालात म्हटले की, वर्ष २०२० साठी विकास दर ६.९ % पर्यंत राहील. पहिल्या सहामाहीत ५.८ ते ६.६% पर्यंत आणि दुसऱ्या तिमाहीत ७.३ ते ७.५ %  राहण्याचा अंदाज आहे. 
 

अहवालातील प्रमुख बाबी 

नियंत्रणाच्या उपायानंतरही रोखतेचे प्रमाण १७% वाढले 
> डिजिटल पेमेंटच्या मोहिमेनंतरही रोखतेचे प्रमाण १७ % वाढून २१.१० लाख कोटी रुपये झाले. 
> आयएलअँडएफएस संकटानंतर एनबीएफसीने व्यावसायिक क्षेत्रासाठी कर्ज उपलब्धता २० %  घटली आहे. 
> सरकारला अतिरिक्त साठ्यातून ५२,६३७ कोटी रुपये दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या आकस्मिक निधीत १.९६ कोटींची शिल्लक आहे. 
> वॉर्निश कोटिंग असलेल्या १०० च्या नोटा लवकरच  :  रिझर्व्ह बँक आता १०० रुपयांची नोट दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यावर वॉर्निशचा थर देणार आहे. लवकरच नव्या नोटा चलनात येतील. 
 

कृषी उत्पादन,ग्रामीण विक्रीत घट होण्याची भीती 
अहवालानुसार, अर्थचक्राला गती देण्यासाठी खासगी गुंतवणूक वाढणे आवश्यक आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि पावसाच्या असमान वितरणामुळे पीक उत्पादन आणि ग्रामीण विक्रीत घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम मोटारसायकल आणि ट्रॅक्टर विक्रीवर होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किमतीतही खूप चढ-उतार आणि अनिश्चितता आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...